पूर्णधनुरासन

1) या आसनामध्ये शरीर पूर्णपणे ताणलेल्या धनुष्याबाणाप्रमाणे बनते. म्हणून त्याला पूर्ण धनुरासन असे म्हणतात. अर्ध धनुरासन व पूर्ण धनुरासनात विशेष असा फरक नाही. सामान्यत: यालाही धनुरासन असे म्हटले जाते. परंतु, सलग प्रयत्न केल्यावर जेव्हा हे आसन सिद्ध होते तेव्हा त्याला पूर्ण धनुरासनचा आकार प्राप्त होतो अर्थात ते पूर्णपणे ताणलेल्या धनुष्यबाणाप्रमाणे दिसते.

2) विधी : मकरासन अवस्थेत पोटावर झोपून दोन्ही पाय आणि हात हळूहळू कमरेकडे घेऊन जा. हनुवटी (दाढी) जमीनीवर टेकवा. पायाचा तळवा-पंजा आणि गुडघा एकत्र असावा. कोहनिया कमरेपासून सटकलेली असावी, दोन्ही हात वरच्या बाजूला ठेवा.

3) आता पायाला गुडघ्यात वळवा आणि दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याना घट्ट पकडून ठेवा. नंतर हात आणि पाय ताणून गुडघेही वर उचला. डोके मागील बाजूस पायाच्या तळव्यापर्यंत हळूहळू घेऊन जा. संपूर्ण शरीराचा तोल बेंबीपासून वरच सांभाळा. कुंभक करून या अवस्थेत 10 ते 30 सेकंदापर्यंत आपण राहू शकता.

4) पुन्हा त्याच स्थितीत येण्यासाठी प्रथम हनुवटी जमीनीवर टेकवून पाय आणि हाताला समांतर क्रमाने क्रमश: हळूहळू जमीनीवर या आणि पुन्हा मकरासन अवस्थेत झोपा आणि पूरक करा. श्वास-प्रश्वास सामान्य झाल्यावर दुसर्यांीदा हे आसन करा. अशा प्रकारे तीन ते चार वेळा या आसनाची पुनर्रावृत्ती करा.

5) सावधगिरी : ज्या लोकांना मणक्याचा किंवा डिक्सचा अधिक त्रास असेल त्यांनी हे आसन करू नये. गंभीर स्वरूपाचा पोटाचा आजार असला तरीही हे आसन करू नये.

6) आसनाचा फायदा : धनुरासनाने पोटाची चरबी कमी होते. तसेच संपूर्ण शरीरातील अंतरंगाचा, पेशी रक्तवाहिन्या आणि सांध्याचा व्यायाम होतो. या आसनामुळे शरीरात उर्जेचे संतुलन केले जाते. ह्दय मजबूत बनते.

7) गळ्याचे विविध आजार नष्ट होतात. पचनशक्ती वाढते. जठरालाही त्याचा फायदा होतो. श्वासप्रक्रिया सुरळीत होते. मेरुदंड स्वस्थ बनले जातात. सर्व्हाइकल, स्पोंडोलाइटीस, कमरेचे दुखणे आणि पोटाच्या विकारांना हे आसन अधिक लाभदायक आहे.

8) स्त्रियांच्या मासिक पाळीदरम्यान होणार्या, आजारांसाठी (महावारी) लाभदायक असून मूत्रपिंड साफ करून त्यासंदर्भातील आजारांसाठीदेखील हे आसन लाभदायक आहे.

Leave a Comment