तुमच्या सतत हातापायाला मुंग्या येतात का ? जाणून घ्या त्यामागची कारणे.

खूप वेळ पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. परंतु, हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर हे कोणत्यातरी त्रासाचे लक्षणआहे. डॉ. निनाद काकडे यांनी हे त्रास कोणते ते सविस्तर सांगितले.

व्हिटॅमिनची कमतरता: जर तुमच्या हात व पाय दोघांनाही मुंग्या येत असतील तर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आहे. तसंच त्यामुळे तुम्हाला थकलेले किंवा आळसवाणे वाटेल.

Carpal tunnel syndrome: खूप वेळ टायपिंग केल्याने तुमच्या मनगटाच्या नसा आकुंचित होतात व त्यामुळे हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामाने Carpal tunnel syndrome चा त्रास दूर होण्यास मदत होईल.

मानेची नस आखडणे : मानेची नस आखडली गेल्यास पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात किंवा तो भाग दुखतो. चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते.

मधुमेह : रक्तातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसांसाठी विषारी ठरते व त्यामुळे हातापायांना मुंग्या येतात. मुंग्या येण्याबरोबरचतुम्हाला खूप भूक किंवा तहान लागत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हायपरथायरॉईसम : थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यासथकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात. म्हणून हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेणे योग्य ठरेल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *