चेहर्‍यावरील नको असलेले केस नष्ट करू शकता.

१. चेहर्‍यावरील नको असलेले केस महिलांसाठी एक मुख्य समस्या आहे. काही महिलांच्या चेहर्‍यावर पुरुषांसारखे केस येतात.

२. सामान्यतः हनुवटी आणि ओठांवरचे केस महिलांसाठी अडचणीचे ठरतात. बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम आणि जेलमुळे त्वचा खराब होण्याचा धोका जास्त राहतो आणि हे केस रेजरनेसुद्धा काढले जाऊ शकत नाहीत.

३. तुम्हालाही अशा समस्येला सामोरे जावे लागत असेल तर आम्ही तुम्हाला चेहर्‍यावरील अनावश्यक केस काढण्याचे काही घरगुती रामबाण उपाय सांगत आहोत. हे उपाय केल्याने तुमची ही समस्या दूर होईल तसेच त्वचाही खराब होणार नाही.

४. डाळीचे पीठ (बेसन) आणि दुध : अर्धा चमचा बेसन, अर्धा चमचा दुध, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा ताजी साय. या सर्व गोष्टी एकत्रित करून चेहर्‍यावर लावा. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करून 25 मिनिटांपर्यंत चेहरा तसाच ठेवा. पेस्ट सुकल्यानंतर हाताने चेहरा स्वच्छ करून नंतर पाण्याने धुवून घ्या.

५. मधाचा उपयोग : कच्च्या बटाट्याचा 2 चमचे रस, रात्रभर भिजवून ठेवून बारीक केलेली तुरीची डाळ, 4 चमचे लिंबाचा रस आणि 1 चमचा मध या सर्व गोष्टी एकत्र करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट चेहर्‍यावर लावून ठेवा. थोड्यावेळाने पेस्ट वाळल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.

६. डाळीचे पीठ (बेसन) आणि दही लावा : डाळीच्या पिठामध्ये दही मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहर्‍यावरील नको असलेल्या केसांवर लावा. थोडावेळ चेहरा स्क्रब करून स्वच्छ धुवून घ्या. दररोज हा उपाय केल्याने चेहर्‍यावरील अनावश्यक केस निघून जातील.

१०. हळद आणि उडीद डाळ : हळद आणि उडीद डाळ पावडर पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून घ्या. या उपायाने चेहरा तेलकट होणार नाही आणि चेहर्‍यावरील अनावश्यक केसही कमी होतील.

११. साखर आणि लिंबाचा रस : साखर आणि लिंबाचा रस समप्रमाणात घ्या. या मिश्रणाने चेहर्‍यावरील नको असलेल्या केसांवर मसाज करा. पंधरा मिनिट हे मिश्रण चेहर्‍यावर लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय नियमितपणे केल्यास चेहर्‍यावरील नको असलेले केस कमी होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *