चेहरा झटपट उजळवणारे घरगुती उपाय

– उजळ चेहरा कोणाला आवडत नाही, परंतु बहुतांश लोक या दुविधेमध्ये राहतात की, एवढ्या कमी वेळेत चेहरा कसा उजळ करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर लक्ष न दिल्याने अनेक जणांच्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय. या उपायांमुळे तुमची त्वचा उजळ होण्यास नक्कीच मदत होईल.

१. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. अंघोळीच्या आधी तयार केलेला लेप चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा.

२. डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलकी मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल.

३. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे 4-5 थेंब देखील टाकू शकता.

४. ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने फायदा होतो.

५. त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्युस प्यावा. संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते.

६. मुलतानी माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग निखरतो.

७. दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेह-यावर लावल्यास फायदा होतो.

८. साधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दो चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवावा व धूऊन टाकावा.

९. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते.

१०. लिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेह-यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच लिंबाची पाने मुल्तानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेह-यावर 15 मिनिटे लावून ठेवून चेहरा धूवावा.

११. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

१२. चेह-याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेह-यावर लावावा.

१३. घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होईल. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो.

१४. ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात. याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते.

१५. चेह-याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण 15 मिनिटे चेह-यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरूवात होते.

१६. अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते.

१७. संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.

१८. पिकलेल्या पपईतील गर चेहर्‍यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

१९. तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्‍यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.

२०. एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

२१. काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.

२२. अॅलोव्हेरा जेलचा म्हणजेच कोरफडीचा वापर केल्याने चेहरा गोरा, स्वच्छ आणि ओलसर राहील. किमान अर्धा तास जेल चेहऱ्यावर लावावे.

२३. सूर्यफुलाच्या बीया रात्रभर भिजत ठेवून सकाळी हळद आणि केसर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. ती पेस्ट २० मिनिटे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल.

२४. आंब्याच्या साली बारीक करून दुधात मिक्स करून पेस्ट तयार करावी. ती पेस्ट चेहऱ्यावर १५ मिनिटे लावावी. त्याने सूर्यप्रकाशामुळे काळी पडलेली त्वचा उजळेल आणि चेहरा साफ होईल.

Leave a Comment