ओठ काळे पडल्यास घरगुती उपाय

१. रात्री झोपतांना गायीच्या दुधाच्या लोणीत केसर मिसळा आणि ते ओठांना लावा. ओठ काळे पडले असतील तर फायदा होईल.

२. झोपण्यापूर्वी बदामाचं तेल ओठांवर लावा. ओठांचा रंग उजळण्यास मदत होईल.

३. मलईमध्ये चिमुटभर हळद टाकून ओठांची मालिश केल्यास ओठांचा कोरडेपणा दूर होतो.

४. रोज कमीतकमी जास्तीत जास्त पाणी प्या. त्यामुळे ओठ काळे आणि कोरडे पडत नाही.

५. बीटचा रस ओठांवर लावल्याने लिपस्टीक लावण्याची गरज पडणार नाही. रोज काकडीचा रस लावल्यानेही फरक पडतो.

६. जर तुमचे ओठ फार वेळ कोरडे राहत असतील तर त्यांना जीभ लावणे टाळा. यासवयीमुळे ओठ अजूनच काळे पडण्याची शक्यता अधिक असते. सोबतच धुम्रपानाची सवय टाळा. म्हणजे ओठांबरोबरच तुमचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते.

Leave a Comment