टीबी रोगाचे लक्षणे – Tuberculosis symptoms

टीबी रोगाची लक्षणे आजकाल वातावरण खूपच प्रदूषित झाले आहे, त्यामुळे लोकांना विविध आजारांनि ग्रासल आहे, टीबी हा त्यातलाच आजार आहे, टीबी हा अतिशय गंभीर आजार आहे. टीबी चे पूर्ण नाव TB (Tuberculosis) आहे टीबी या आजाराला बळी पडणारे रुग्ण सर्वात जास्त भारतात आढळतात, भारतात दर वर्षी जवळ जवळ ४ लाख लोकांचा टीबी मुळे मृतू होतो. म्हणून टीबी ची लक्षणे जाणून घेणे आवशक आहे. आपल्याकडे एक गैरसमज आहे कि टीबी हा रोग अनुवांशिक आहे पण टीबी हा रोग अनुवांशिक नाही टीबी हा कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. म्हणून या आजारावर त्वरित व योग्य ते उपचार घेणे आवशक आहे. Medical Science च्या प्रगती मुळे टीबी हा रोग पूर्ण पणे बरा होऊ शकतो.

टीबी रोगाचे लक्षणे  TB (Tuberculosis)

टीबी ची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे, जर आपल्याला टीबी ची लक्षणे आधीच माहीत असतील तर आपण योग्य वेळेवर त्याचावर योग्य ते उपचार करू शकतो व टीबी या आजारापासून पूर्ण बरे होऊ शकतो. टीबी हा एक संसर्गजन्य रोग आहे आणि हा रोग जीवाणूनमुळे होतो, हा रोग एका व्यक्तीपासून दुसरया व्यक्तीला होतो, हे जीवाणू शरीरात पसरून शरीराला कमजोर करता, हे जीवाणू सामान्यतः फुफुसा मध्ये आढळतात.

टीबी हा रोग फक्त फुफ्फुसांना नाही तर पूर्ण शरीरातील अंगाना हळू हळू प्रभावीत करतो, म्हणजेच आतडी, त्वचा, हाड, मूत्रपिंड, हृदय, हे सर्व अंग संक्रमित होतात. हा आजार जास्त पसरल्याने रोग्याला वाचवणे कठीण जाते, म्हुणुन याची लक्षणे जाणून घेणे आवश्यक आहे.

टीबी या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे जास्त काळासाठी खोकला होणे, जर आपल्याला ३ आठवड्याहून अधिक काळ खोकला असेल तर हे टीबी चे सुरवातीचे लक्षण आहे, म्हणून खोकला झाल्यावर त्याची तपासणी करून घ्या. आणि दुसरा लक्षण म्हणजे टीबी च्या सुरवाती लक्षणाम्ध्ये कफ मध्ये रक्त येतो आणि रक्त येत असेल तर याच्याकडे गांभीर्याने बघीतले पाहिजेत व डॉक्टर च्या सल्याने त्वरित योग्य ते उपचार घेतले पाहिजेत.

 

टीबी रोगाची लक्षणे

जर कोणाला ताप येत असेल पण हा ताप फक्त संध्याकाळी येत असेल तर हे टीबी चे लक्षण आहे, याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित डॉक्टर कडे तपासणी करा, जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल हा दम्या सम्बन्धी असू शकतो परंतु हा त्रास भरपूर होत असेल आणि छातीत दुखत असेल तर हा टीबी चा प्रमुख लक्षण आहे. जर आपल्या छातीत जळजळ होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित योग्य ते डॉक्टरी सल्याने उपचार करून घ्या.

टीबी झाल्यावर किंवा शरीर या रोगाने संक्रमित झाल्याने आपल्याला कमी भूक लागते, व कोणतेही खाद्य पदार्थ  खाण्याची इच्छा होत नाही हा देखील एक लक्षण असू शकतो, भूक न लागल्याने शरीर कमजोर होते व मोठ्या प्रमाणात वजनात घट होते, टीबी मुळे सर्वात जास्त संक्रमण फुफ्फुसाम्ध्ये होते, रात्री झोपताना भरपूर घाम येणे हे देखील एक लक्षण आहे, हि लक्षणे ओळखून टीबी वर डॉक्टरी सल्याने योग्य तो उपचार करावा.

 

 

 

 

 

Leave a Comment