बाळाला किती दिवस अंगावर पाजावे ?

१) बाळाला जास्तीत जास्त दिवस अंगावर पाजावे. पहिले सहा महिने तर आईचे दूध हेच बाळाचे अन्न व पाणी असते. पण निदान बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे.

२) अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. तिच्या जेवणात पालेभाज्या, दूध, फळे, मोड आलेली कडधान्ये ह्या गोष्टी असाव्यात.

३) बाळ आनंदी असेल, त्याला शी व्यवस्थित होत असेल व झोपही चांगली येत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळते असे समजावे.

Leave a Comment