आहार वयोगटानुसार बाळाचा आहार

– ० ते ६ महिने – फक्त स्तनपानच दयावे.

– ६ ते ९ महिने – भाताची पेज, डाळीचे पाणी, मटणाचे सुप, नाचणीची किंवा डाळ, तांदळाची पेज, फळांचा रस दयावा.

– ९ ते १२ महिने – वरण, भात, उकडलेला बटाटा दुधात कुस्करून, पोळी दुधात बारीक करून, फळे दयावे.

– १ वर्षानंतर – घरात जेवणासाठी जे तयार केलेले पदार्थ असतील. तेच थोडे कमी तिखट करून या वयातल्या मुलांना देता येते.

२) बाळाला दिवसातून किती वेळा खायला दयावे (पूरक आहार )-

– ६ ते ९ महिने- २ वेळा

– ९ ते १२ महिने- ३ ते ४ वेळा

– दुसऱ्या वर्षातसुद्धा आईचे दूध हा बाळाच्या पोषक आहारातील महत्त्वाचा घटक असतो. त्यापासून बाळाचे पोषण व संरक्षणही होते. बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत स्तनपान चालू ठेवावे. जन्मापासून ५ व्गार्षानंतर बाळाच्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

– त्यानंतर ठराविक कालांतराने बाळाचे वजन, उंची व शरीराची इतर मोजमापे नियमितपणे घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे बाळाची वाढ योग्य प्रमाणात होत आहे किंवा नाही याची माहिती मिळू शकते.

– वाढ योग्य होत नसल्यास त्या दृष्टीने तपासणी करून अयोग्य वाढीची कारणे शोधून काढता येतील. सदर कारणानुसार त्या बालकावर उपचार करून पुढील गुंतागुंत व मृत्यू निश्चितपणे टाळता येतील.

– ५ वर्षापर्यंत बालकाची नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.

Leave a Comment