बाळाला सुरुवातीला कोणता वरचा आहार दयावा ?

१) सहा महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबरच बाळाला वरच्या आहाराची गरज पडते. सुरुवातीला भाज्यांचे सूप, वरणाचे पाणी, वरचे दूध, फळांचा रस, शहाळ्याचे पाणी, टोमाटोचा रस असा पातळ आहार दयावा.

२) त्यानंतर भाकरी/पोळी मऊ करून त्यात वरणाचे किंवा भाज्यांचे पाणी किंवा दूध घालून दयावे. भातावर वरण किंवा भाजीचे पाणी घालून दयावे.

३) उकडलेला बतात, रताळे, गाजर, अंड्याचा पिवळा बलक, हेही अधून मधून द्यावं. पुढे- पुढे सर्व प्रकारची फळे, गव्हाची खीर, भाकरी, पोळी, पालेभाज्या, मोड आलेली उसळ, उकडलेले अंडे असा आहार दयावा. वर्षभरात इतरांप्रमाणे सर्व आहार बाळाला मिळाला पाहिजे. बाहेरचे पदार्थ देणे टाळावे.

Leave a Comment