आरोग्यासाठी मधाचे फायदे(Benefits of Honey)

मध ही फक्त गोडच असते असे नाही तर डॉक्टररांच्या मते मधाचे औषधी फायदे पण खूप असतात. तर चला मग जाणून घेऊया अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्यामुळे मधाला इतके महत्वाचे स्थान आहे.

तुम्हाला माहिती आहे का, डोळ्यात टाकण्यात येणाऱ्या आय ड्रॉप मधे मधाचा वापर केला जातो.

जर तुम्ही रामदेव बाबांच्या पतांजली बद्दल जाणून असाल, ज्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे तर तुम्हाला माहीत असेल की त्यांच्या बहुतेक उत्पादनामध्ये मधाचा वापर केला जातो.

जर तुम्ही लठ्ठपणामुळे त्रस्त असाल, तर रोज सकाळी कोमट पाण्यात मध टाकून पिल्याने आपला लठ्ठपणा कमी होण्यास फायदा होतो.

आयुर्वेदीक उपायांमध्ये आपल्या हृदयासाठी दालचिनी व मध एकत्र करून पिल्याने आपल्या रक्तातील खराब कॉलेस्ट्रॉल ची मात्रा 10 टक्क्यांनी नियंत्रणात येऊन रक्ताभिसरणक्रिया सुरळीत होऊन शारीरिक स्वास्थ्य लाभते.

आपल्या शरीराला लागणारी साखर व उर्जा आपल्या शरीरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साखरेमधून मिळते. मधाची जागा गोड पदार्थ घेऊ शकत नाही कारण ते आपल्या शरीरास हानिकारक असतात. मधातून मिळणारी प्राकृतिक उर्जा आपल्या शरीरास उपयोगी असते.

लग्नसमारंभात किंवा दुसऱ्या कार्यक्रमात अती भोजन ग्रहण केल्याने पोटाचे त्रास किंवा पचनक्रियेत गडबड झाल्यास लिंबूचा रस आणि मध एकत्र करून पिल्याने आराम मिळतो. मध पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते तसेच गॅस सारख्या समस्यांवर देखील उपायकारक आहे.

मधा मधील विटामिन्स व मिनरल शरीराच्या रोगप्रतिकार प्रणालीसाठी गरजेचे असतात. मधामुळे अनेक छोट्या मोठ्या आजारापासून आपले संरक्षण होते. शुद्ध मधामधे कॅन्सररोधी गुण देखील असतात.

या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की इंटरनेट वर मिळालेली कुठलीही माहिती अनुसरण करण्या आधी आपल्या आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा कारण त्यांना आपल्या आजाराची लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजतात व आपल्या आजारावर योग्य ते उपाय आपल्याला सुचवतात.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *