ब्रह्म मुद्रा

1) ब्रह्मदेवाला चार मुख आहेत. त्याच्या नावानेच हे आसन आहे. या आसनात आपण आपली मान चारही बाजूने नेतो, म्हणून याला ब्रह्ममुद्रासन म्हणतात.

2) या आसनात आपण पद्मासन, सिद्धासन वा वज्रासन यापैकी कोणत्याही स्थितीत बसू शकता. कंबर व मान सरळ रेषेत हवी. त्यानंतर मान हळूहळू उजव्या बाजूला न्यावी. तेथे थोडावेळ थांबावे. नंतर मान हळू हळू डाव्या बाजूला न्यावी. तेथे पुन्हा थोडे थांबावे. मग पुन्हा उजवीकडे न्यावी. त्यानंतर परत आल्यानंतर मान वर न्यावी आणि नंतर खाली न्यावी. अशा तर्हेोने एक चक्र पूर्ण होते. अशी चार ते पाच चक्रे तुम्ही करू शकता.

3) ब्रह्म मुद्रा करताना पाठिचा कणा पूर्ण ताठ हवा. मान डाव्या व उजव्या बाजूला नेण्याची गती सारखी हवी. यात घाई करू नका. हनुवटीला खांद्याच्या दिशेने न्या..

4) स्पॉंडायलिटीस वा थॉयराईडचा त्रास असणार्यांतनी हनुवटी वरच्या दिशेने न्या. मान खाली करत असताना खांदे झुकवू नका. कंबर, मान व खांदा सरळ ठेवा. मान वा गळ्यात काही गंभीर रोग असल्यास योग तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

5) ज्या लोकांना स्पॉंडिलायटिस वा थॉयराईडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. मान लवचिक होतानाच मजबूतही होते. अध्यात्मिक दृष्टिकोनातही हे आसन फायदेशीर आहे.

Leave a Comment