मयूरासन

1) मयूर म्हणजे अर्थातच मोर. या असनात शरीराचा आकार मोरासारखा होतो, म्हणून त्याला मयूरासनम्हणतात.

2) दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवावेत. हाताचा अंगठा व बोटे आतल्या बाजूने ठेवून तळहात जमिनीवर ठेवा. दोन्ही हातांवर योग्य तेवढे वजन देऊन पाय हळू हळू उचला.

3) हाताच्या पंजाच्या सहाय्याने शरीराला पुढच्या दिशेने झुकवा आणि पाय हळू हळू सरळ करा. पूर्वस्थितीत येण्यासाठी आधी पाय जमिनीवर आणा. त्यानंतर मग वज्रासनाच्या स्थितीत या.

4) इशारा- ब्लडप्रेशर, टिबी, ह्रदयरोग, अल्सर व हार्निया हे रोग असलेल्यांनी आधी योग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

5) या आसनामुळे पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठ, गॅस व पोटासंबंधी विकार दूर होतात. आतडे व त्याच्याशी संबंधित भाग मजबूत होतात. शिवाय गुदाशय व मुत्राशयातील विकार दूर होतात.

6) या आसनाने वक्षस्थळ, फुप्फुस, बरगज्या व प्लिहा मजबूत होतात. मधुमेही रूग्णांनाही याचा फायदा होतो. मान व पाठिच्या कण्यासाठीही हे आसन लाभदायक आहे.

Leave a Comment