अश्वगंधा चे फायदे व नुकसान-(Advantages and disadvantages of Ashwagandha)

अश्वगंधा एक गुणकारी औषध आहे आणि हे आयुर्वेदिक आहे यामुळे खुप उपयोगी आहे. अश्वगंधा मुळे अनेक आजार ठीक करण्यासाठी मदत …

Read more

गरम पाणी पिण्याचे फायदे-(Benefits of drinking Hot water)

गरम पाण्याचे फायदे

गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी खूप फायदेमंद असते. आयुर्वेद आणि विज्ञान देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. पावसाळ्यात जास्त करून पाण्या संबंधी आजार होतात आणि पसरतात. खासकरून पोटाचे आजार होतात, म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात ज्या प्रमाणे वातावरणात बदल होतो त्या प्रमाणे पाणी प्यावा.

गरम पाणी पिण्याचे फायदे

जास्त करून लोक गरम पाणी पीत नाहीत कारण त्यांना गरम पाण्याचे फायदे माहीत नसतात. गरम पाणी आपल्या आरोग्या साठी खूप फायदेशीर असते, यामुळे आपले अनेक आजारांपासून बचाव होते. बऱ्याच देशांमध्ये पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर केला जातो. डॉक्टरांच्या नुसार चांगल्या आरोग्यासाठी आपण दिवसातून कमीत कमी ८ – १० ग्लास पाणी प्यायला हवे. पण जर आपण दिवसातून ३ वेळा गरम पाणी पीत असाल तर याचे आपल्याला खूप फायदे होतील, गरम पाणी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवते व आपले आरोग्य चांगले ठेवते. गरम पाणी पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते, याचे आपल्या त्वचेवर देखील चांगले फायदे होतात, अजून खूप फायदे आहेत.

आपले वजन वाढतच असेल आणि किती ही प्रयत्न केले तरी कमी हो नसेल तर गरम पाण्यात मध आणि लिंबू पिळून सतत ३ महिने हे प्या. आपल्याला याचा खूप फायदा होईल आणि हळू हळू आपल्याला फरक जाणवेल. कारण गरम पाणी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढून देत नाही आणि चरबी हळूहळू कमी करतो. म्हणून डॉक्टर देखील गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात. जेवल्यानंतर १ कप गरम पाणी पिण्यास सुरवात करा याचा आपल्याला फायदा होईल.

आपल्याला कधीकधी जाणवते कि जरावेळ उन्हात किवा थंडीत बाहेर गेल्यावर सर्द्दी खोकला होता. याच्यावर जास्त काही करण्याची गरज नाही. आपण रोज ३ ग्लास गरम पाणी पीत जा, असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. कधी कधी बेमोसम आपल्याला सर्दी खोकला होतो अशावेळी गरम पाणी पिल्याने सर्द्दी खोकला जातो. गरम पाणी पिल्याने घश्या संबंधी आजार दूर होतात उदा. घश्यात खवखवणे, कफ, आवाज बसणे  ई.

महिलांनी गरम पाण्याचा पिण्यासाठी वापर जास्तीत जास्त करावा, कारण पाळी मुळे  महिलांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते, यावेळी गरम पाण्याने पोटाला शेक दिल्याने आराम मिळतो. यावेळी थोडे थोडे गरम पाणी पीत जा.

गरम पाणी पिल्याने शरीरात (detoxification) निर्विशीकरण होते आणि शरीराचे शुद्धीकरण करून शरीरातील अशुद्धी दूर करते. गरम पाणी पिल्याने शरीराचे तापमान वाढते त्यामुळे घाम येतो. घाम आल्याने शरीरातील अशुद्धी दूर होतात. गरम पाण्यामुळे पोटा संबंधी विकार दूर होतात, आणि ज्यांना ग्यास आणि बध्कोष्टता होते त्यांना गरम पाणी पिणे खूप फायदेमंद आहे. म्हणून दिवसातून २ – ३ वेळा तरी गरम पाणी प्या.

चेहऱ्यावर पडणाऱ्या सुर्कुत्यामुळे आपण चिंतीत असतो. पण हि एक नैसर्गीक बाब आहे. परंतु इतरांच्या तुलनेत जास्त व लवकर चेहरयावर सुरकुत्या येत असतील तर हि चिंतेची बाब आहे हि समस्या दूर करायची असेल तर त्यासाठी गरम पाणी प्यायला सुरवात करा. काही दिवसातच आपल्याला फरक जाणवेल, आपली त्वचा चमकदार होईल, चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील आणि आपल्या चेहऱ्याचा रंग निखरेल.

आपले शरीर दुखत असेल तर आपल्याला गरम पाण्याचा सेवन केला पाहिजे, गरम पाणी पिल्याने आपली डोकेदुखी व पोटदुखी आणि शरीराचे दुखणे या समस्यांपासून आराम मिळेल. आपल्या त्वचे संबंधी समस्या होणार नाहीत, गरम पाणी पिल्याने आपल्या त्वचेत ओलावा (Moisture) राहतो. त्यामुळे त्वचेच्या रोगांपासून बचाव होतो. याच्या व्यतिरिक्त गरम पाणी केसांसाठी खूप फायदेमंद असतो. यामुळे केसांचा चमकदार पणा वाढतो तसेच केसांच्या वाढीसाठी फायदेमंद आहे. गरम पाणी पिल्याने पाचन क्रिया सुधारते, जेवल्यानंतर एक कप गरम पाणी पीत जा.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

 

सारखे सारखे लघवीला होणे व त्याची कारणे-( Frequent Urination: Causes and Treatments)

सारखे सारखे लघवीला होणे याचे अनेक करणे असू शकतात, तसं पाहता मूत्रविसर्जन ही आपल्या शरीरातले अशुद्ध पदार्थ शरीराबाहेर उत्सर्जित करण्याची एक नैसर्गिक व अत्यावश्यक क्रिया आहे. प्रत्येक निरोगी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला ७० ते ८० मिलि एवढे मूत्र तयार होत असते.

पण काही विकारात मात्र दिवसासुद्धा अनेकवेळा लघवी होत राहते. काहींना प्रत्येक वेळेस भरपूर होते तर इतरांना अगदी थोडी थोडी आणि सतत होत राहते. काही रुग्णांमध्ये दिवसा विशेष नाही पण रात्री खूप वेळा लघवीला उठावे लागते. असे विविध त्रास अनेक आजारात होतात. दिवसातून ७-८ वेळेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे म्हणजे बहुमूत्रता होय.

वारंवार लघवीला कां जावे लागते?

काही आजारांनी व्यक्तीच्या मूत्रपिंडातून दर तासाला जास्त प्रमाणात लघवी बाहेर पडते. त्यामुळे दिवसभरा २.५ लीटरपेक्षा जास्त लघवी होऊ शकते. याची कारणे

जीवनशैली व सवयी – जास्त प्रमाणात पाणी, सरबत आणि इतर द्रव पदार्थ पिण्यात आले असल्यास साहजिकच मूत्र-विसर्जनसुद्धा तेवढ्याच जास्त प्रमाणात होणारच. याशिवाय चहा, कॉफी, थंड पेये, मद्य जास्त प्रमाणात घेणार्‍या लोकांना जास्त प्रमाणात आणि वारंवार लघवीला होते. सतत खूप थंड हवामानात राहणार्‍यांना, सतत एसीमध्ये काम करणार्‍यांना देखील हा त्रास होतो.

मधुमेही रुग्ण – मधुमेहात लघवीचे प्रमाण वाढलेले असते. किंबहुना रात्रीच्या वेळेस सतत लघवीसाठी उठणे हे     मधुमेहाच्या प्राथमिक निदानाचे  व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. जेव्हा मधुमेही रुग्णाची रक्तातली साखर वाढलेली असते, तेव्हाही त्याची मूत्रप्रवृत्ती वाढलेली आढळते.

मूत्रमार्गाचे इन्फेक्शन – मूत्रात जर जंतुसंसर्ग झाला तर वरचेवर लघवी होऊ लाते. मूत्राशयाला सूज असल्यास, मूत्रपिंडे निकामी झाल्यावर लघवीचे प्रमाण वाढते.

काही औषधे डाययुरेटिक गटातील औषधे, उच्च रक्तदाबावरील काही औषधे, काही निद्रानाशके यांच्या परिणामांनी लघवीचे प्रमाण वाढू लागते.

गर्भावस्था गरोदर अवस्थेतील साधारण तिसर्‍या महिन्यानंतर आकारमानाने वाढत जाणार्‍या गर्भाशयाचा दबाव मूत्राशयावर येऊन सारखी थोडी-थोडी लघवी होते.

प्रोस्टेट – प्रोस्टेट नावाच्या ग्रंथी पुरुषांच्या मूत्राशयाच्या बाह्यभागास लागून बाह्यमूत्रमार्गाच्या सुरुवातीला असतात. वयाच्या पन्नाशीनंतर त्याचे आकारमान वाढू शकते. अशा वेळेस मूत्र बाहेर पडण्यास अडथळा होऊ लागतो आणि लघवीला थोडी थोडी पण सतत होते.

इतर आजार – ओव्हरऍक्टिव्ह ब्लॅडर, पाठीच्या मणक्यांचा आजार, मूत्राशयाचा कर्करोग, कर्करोगासाठी रेडिओथेरपी घेतल्यावर अशा प्रकारचे त्रास होतात.

वारंवार लघवी होणे, या लक्षणाचा उपचार करताना तो ज्यामुळे होतोय त्या आजाराप्रमाणे करावा.

आहारामध्ये जास्त तेलकट मसालेदार पदार्थ टाळावेत. चहाकॉफी, मद्य यांसारखे उष्णपान टाळावे. धूम्रपान टाळावे. दिवसातून -१० ग्लास पाणी प्यावे. पाणी पिण्याने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर पडतात, असा समज असल्याने काही दिवसभर भरपूर पाणी पितात. पाणी पिण्याचे नियम माहीत नसल्याने कधीही, एका वेळेस एक-दीड लीटर पाणी प. काही जण दिवसभर पाणी प्यायला वेळ नसतो म्हणून रात्रीच जास्त पाणी पितात व रात्रभर लघवीला जातात. फक्त पाणी पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळेही हा वारंवार लघवीला जाण्याचा त्रास होऊ शकतो. आहारामध्ये जास्त चोथायुक्त आहाराचा वापर करावा.मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपचार घ्यावा.औषधांमुळे होत असेल तर डॉक्टरांकडून औषधे बदलून घ्यावी. * प्रोस्टेटसारख्या काही आजारांत विशेष औषधे किंवा शस्त्रक्रियात कामी येते.

त्याचप्रमाणे लहान मुलांच्या या समस्येला गंभीरतेने घेतले पाहिजे. जर मूल वारंवार लघवीला जात असल्यास  त्याच्या पालकांना याबद्दल कळवावे, कधीकधी समुपदेशनाने, योग्य कारण निवारण झाल्यास ही समस्या सुटू शकते.

काही आजारात मूत्राशयांवर ताबा रहावा यासाठी काही व्यायामसुद्धा केले जातात. ओटीपोटाच्या स्नायूंचे व्यायाम देखील देखरेखीखाली केल्यास ओव्हर ऍक्टिव्ह मूत्राशयात लाभ होतो.होतो

औषधी द्रव्यांचा विचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यवस्थित रोगाचे निदान करून त्या त्या कारणांची चिकित्सा घ्यावी. त्याचप्रमाणे गोक्षुरादि गुग्गुळ, चंद्रप्रभावटी, वरुणादि काढा, पुनर्नवासवसारख्या मूत्रसंस्थांवर काम करणार्‍या औषधांचा वापर करावा. तसेच ओवा १ चमचा, २ चमचे तीळ एकत्र करून खाण्यास द्यावे. त्रिफळा चूर्ण व लोहभस्म मधातून देता येते. जांभळीचा अवलेह किंवा बियांचे चूर्ण साखरेतून द्यावे.

वारंवार लघवीला जाणे ही जरी विशेष त्रासदायक नसली तरी आपल्या डॉक्टरांशी त्याची चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेणे हेच महत्त्वाचे असते.

हृदयविकाराची लक्षणे, कारणे आणि उपाय | Heart attack Symptoms causes and the treatment in Marathi

Heart attack Symptoms ,causes and the treatment in Marathi

हृदयविकार वर उपाय हृदय हे शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे, आणि हृदयाला शरीराचे एक प्रकारे इंजिन मानले जाते, हृदया मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या आली तर मृत्यु हि होऊ शकतो. Heart Blockage अशी समस्या आहे ज्यामुळे Human pulses काम करणे बंद करतात यावेळी Heart pulses हळू हळू चलतात, हि समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. हि समस्या काहिंना जन्मजात असते. ज्या लोकांना Heart Blockage हि समस्या जन्मजात असते या समस्येला ला congenital heart blockage म्हणतात आणि जन्मानंतर होणारया Heart Blockage समस्येला acquired heart blockage म्हणतात आज काल Heart Blockage या बरयाच समस्येला जणांना सामोरे जावे लागते. बदलेली आधुनिक जीवन शैली, खाण्या पिण्याच्या सवयी मध्ये झालेला बदल,

पण Heart Blockage या समस्येवर  उपाय उपलब्ध आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून याची तपासणी केली जाते electrocardiogram या तंत्रज्ञानाचा वापर करून तपासणी केली जाते या तंत्राद्यानाना मुळे  आपल्या हृदयाची स्थिती पाहण्यासाठी तसेच अनेक हृद्या सम्बधी अनेक विकारांचे ज्ञान electrocardiogram च्या परीक्षणा मुळे  होण्यास मदत होते. Heart Blockage ची लक्षणे ओळखणे सोपे आहे आणि Heart Blockage ची करणे जाणून घेणे आवश्यक आहे यामुळे आपण स्वत: सावध राहू शकता तसेच इतरांची मदत करू शकता.

Heart Blockage ची लक्षणे

Heart Blockage चे प्रथम लक्षण म्हणजे छातीत जोरात दुखणे, छातीत जोरात दुखण्याने रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि Heart Blockage हि समस्या कोणाला असेल तर त्याला साधारण काम करण्यास देखील त्रास होतो, आणि हि व्यक्ती लवकर थकते. आणखी काही साधी कारणे आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष करू नका उदा. डोकेदुखी, चक्कर येणे, अचानक बेशुद्ध होणे.

Heart Blockage ची कारणे

प्रत्येक आजाराची वेगवेगळे कारण असू शकतात, Heart Blockage Plaque मुले होतो Plaque कोलेस्ट्रोल,फायबर टिशू, पांढरया पेशी यांचे मिश्रण होते आणि शिरांच्या आतमध्ये हळू हळू रक्त गोठ्ते त्यामुळे योग्य पद्धतीने रक्ताभिसरण होत नाही, आणि जे जमा होत त्याला Heart Blocker म्हणतात Plaque चा जमाव’ जडपणा त्याची तुटण्याची प्रवृत्ती जर Plaque मध्ये जास्त जाडसर पणा असेल किंवा कडक असेल तर त्याला Stable Plaque म्हणतात जर Plaque नरम असेल तर याला तोडता येऊ शकते म्हणून याला Unstable Plaque म्हणतात, हे दोन्ही प्रकारचे Plaque धोकादायक असतात यामुळे Heart Attack येऊ शकतो, दोन्ही प्रकारच्या Plaque च्या बाबतीत खास गोष्ट आहे ज्या रोग्या साठी खूप फायदेमंद आहे.

Heart Blockage Treatment, Causes हार्ट वर योग्य ते उपचार,  कारणे Stable Plaque: Stable Plaque च्या तुटण्याने फरक पडत नाही त्याचप्रमाणे गंभीर Heart Attack येत नाही या प्रकारचे Plaque हळूहळू वाढतात अशात रक्त प्रवाहाला नवी (रक्तवाहिन्या arteries) चा रस्ता शोधण्यास मोका मिळतो ज्याला collateral vessels म्हणतात हि vessel block झालेल्या (arteries) राक्त्वाहीनिस Bypass करते आणि हृदयाच्या मासंपेशीन पर्यंत आवश्यक रक्त आणि ऑक्सिजन पोचवतात.  Unstable Plaque: – Unstable Plaque मध्ये Plaque तुटण्याने एक अडथला निर्माण होतो आणि cholesterol पूर्ण विकसित व्हायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मासंपेशींना गंभीर रूपाने नुकसान पोचते, यामुळे काही वेळा अचानक हृदयविकाराचा झटका येतो. तर हे दोन Plaque चे प्रकार आहेत आता यावरील उपाय पाहूयात. Heart Blockage पासून वाचण्यासाठी आपण काही उपाय करू शकता, ज्या मुळे  आपण या आजारापासून वाचू शकता आपण तंदुरुस्त होऊ शकतो आणि Heart Blockage ची समस्या दूर होईल, धूम्रपान करू नका जर दूसरा कोणी धुम्रपान करत असेल तर त्याला पण धूम्रपानाच्या धोक्यापासून सावध करा, आपले हृदयाचे स्वास्थ सुधरण्यासाठी तसेच आपण तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करावा, चालण्याचा व्यायाम करा, वेळेवर जेवण करा, पोष्टिक आहार करा, आपले वजन नियंत्रित ठेवा जास्त वजन वाढून देऊ नका,   Heart Blockage Treatment

 

Heart Blockage Treatment वर आपण काही घरगुती उपाय करू शकता जसे दुधामध्ये लसणाच्या २ – ४ पाकळ्या घालून ते दुध उकळून घ्या, आणि हे दुध रोज प्या यामुळे आपल्याला आराम मिळेल, एक ग्लास दुधात हळद टाकून उकळून घ्या आणि कोमट झाल्या वर त्यात मध टाकून प्या, एक ग्लास पाण्यात लिंबाचे रस, काळी मिरी, व मध टाकून ते पाणी प्या, चहात आल टाकून प्या, पाण्यात आल टाकून उकळून घ्या आणि त्यात मध टाकून पाणी प्या, आपण जो सलाड बनवतो त्याच्यात जवस च्या बीया टाका व खा, जेवणात साधरण भात खाण्या ऐवजी लाल यीस्ट भात खा, रात्र भर पाण्यात मेथी भिजून ठेवा सकाळी ती  मेथी खा व शिल्लक राहिलेले पाणी प्या.

 

कानाने कमी ऐकू येण्यावर उपचार | Natural Remedy For Better Hearing

कानाने कमी ऐकू येण्यावर उपचार | Natural Remedy For Better Hearing

आजकाल मोठ्याप्रमाणात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाममुळे बहिरेपणा हि समस्या सामान्य बाब झाली आहे, पण याच्या कडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कार, बसेस, ट्रेन यांचे मोठ्याने वाजणारे कर्कश हॉर्न मोठ मोठ्या कंपन्यांचे सायरन यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. सततच्या या त्रासामुळे बहीरेपणा येऊ शकतो, यामुळे फक्त बहिरेपणा नाही तर शारीरिक व मानसिक त्रास होतो. जेंव्हा समोरची व्यक्ती बोलते तेंव्हा तो बोलत असताना काही विशिष्ट ध्वनी तरंग निर्माण होतात त्यामुळे हवेत कंपन उत्पन होतात, ज्यामुळे आपल्याला ऐकू येते, पण कमी ऐकू येत असल्यामुळे ही कंपन ऐकू शकत नाही, बहिरेपणा केवळ एका कानाने नाही तर दोन्ही कानाने होऊ शकतो. बहिरेपणा वर भरपूर उपचार उपलब्ध आहेत.

 

कानाने कमी ऐकू येण्याची कारणे

बहिरेपणा ची अनेक कारणे असू शकतात, बहिरेपणा हे नैसर्गीक हि असू शकते तर काहीना बहिरेपणा जन्मजात हि असू शकतो तसेच जसजसे आपले वय वाढत जाते हि समस्या उद्भवते खास करून वृद्धामध्ये हि समस्या जास्त करून आढळते. कामाच्या ठिकाणी होणारे मोठे आवाज, कानामध्ये होणारे संक्रमण, कानाच्या हाडाची कमी वाढ किंवा जास्त प्रमाणात वाढ, मोबाईल चा सतत वापर, हेडफोन चा वापर, मोठ मोठे साऊंड सिस्टीम मधून निर्माण होणारा आवाज, इत्यादी बहिरेपनाची कारणे असू शकतात.

 

कानाने कमी ऐकू येण्याची लक्षणे

कमी ऐकू येणे किंवा बहिरेपणा यांची लक्षणे आपल्याला काही कालावधी नंतर समजतात, यामुळे याच्यावर वेळेवर उपचार होत नाहीत. पण जेंव्हा पण आपल्याला बहिरेपानाची लक्षणे लक्षात येतील तेंव्हा याच्या कडे दुर्लक्ष करू नका डॉक्टरांकडे जाऊन याच्यावर त्वरित उपचार करावेत, बहिरेपणाची लक्षणे: कानामध्ये शिट्टी सारखा आवाज येणे, कमी ऐकू येणे किंवा फक्त मोठ्याने ऐकू येणे, फोन वर बोलताना कानात दुखणे, इत्यादी बहिरेपणाची कारणे आहेत ती आपण सहजरीत्या ओळखू शकतो.

 

बहिरेपणावर उपचार

 

बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, योग्य त्या डॉक्टरी सल्याने बहिरेपणावर उपचार होऊ शकतो, तसेच याच्यावर काही घरगुती उपाय देखील आहेत, तुळस व राई चे तेल तसेच राई चे तेल व धने, कांदा यांचा वापर करून आपण बहिरेपनावर उपचार करू शकतो.

तुळस व राई चे तेल : – राईच्या तेलात तुळशीची पाने टाकून गरम करून घ्या मग थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका.

 

राईचे तेल व धने : – राई च्या तेलात धन्याचे दाने गरम करून घ्या, शिजल्यानंतर थंड झाल्यावर हे गाळून घ्या व एक एक थेंब कानात टाका.

कानात पांढरया कांद्याचा रस हि गुणकारी असतो. दुधात चिमुटभर हिंग टाका आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याचे २ – ३ थेंब कानात टाका. लसणाच्या ७ – ८ पाकळ्या राई च्या तेलात गरम करा जो पर्यंत त्या पाकळ्या करपत नाही, नंतर तो तेल गाळून घ्या व थंड झाल्यावर २ – ३ थेंब कानात टाका, एक चमचा बेलाच्या पानाचा रस व डालिंबाच्या पानाचा रस हे दोन्ही रस १०० ग्राम राई च्या तेलात उकळवा थंड झाल्यावर नियमितपणे हा रस कानात टाकल्याने आपल्याला याचे फायदे होतील. कानात डालचीनी चा तेल देखील बहिरेपणावर उपयोगी आहे.

 

कधी कधी बहिरेपणा बरा होत नाही मग त्याच्यावर एकच इलाज म्हणजे कानाच्या मशीन चा वापर करणे या मशीन मुळे ऐकू येण्यास मदत होते, यामुळे अजून बहिरेपणा वाढत नाही, काही डॉक्टरांचं अस म्हणन आहे कि आपल वय ३० – ४५ च्या मध्ये असेल आणि आपल्याला चांगले ऐकू येतय तरीही २ वर्षातून एकदा कानांचे चेकअप करावे. बहिरेपणा न होण्यासाठी काही सावधगिरी बाळगाव्यात कानात हेडफोन लाऊन आवाज मोठा करून ऐकू नये, टीव्ही चा आवाज कमी ठेवा, अंघोळ करताना कानात पाणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी, नद्या, तलाव, समुद्र, धबधब्यात अंघोळ करताना कानात कापूस घालावा यामुळे कानात पाणी जाणार नाही, कामाच्या ठिकाणी मोठ्याने आवाज होत असतील, जास्त प्रमाणात धूळ उडत असेल तर ear protection devices चा वापर करावा, कान साफ करता वेळी कानात काडी किंवा इतर कोणतीही टोकदार वस्तुने साफ करू नका.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

भूक वाढवण्याचे उपाय व भूक न लागण्याचे कारण(Loss of Appetite Treatment)

भूक वाढवण्याचे उपाय:- आजकालच्या जीवनात प्रत्येकजण तणावग्रस्त जीवन जगत आहे, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात शरीराला उर्जा मिळणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी योग्य वेळी आहार घेणे गरजेचे आहे, आपल्याला भूक लागत नसेल किवा आपण योग्य पद्धतीने वेळेवर जेवत नसाल तर ही गंभीर समस्या आहे. कारण शरीराला योग्य पोषक तत्वे आहारातून मिळतात, योग्य वेळेवर आहार न घेणे किंवा कमी आहार घेणे यामुळे वजन घटणे  किंवा शारीरिक कमजोरी अशक्तपणा या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

लोक जाणूनबुजून आपल्या आहारावर दुर्लक्ष करतात , पण अशी बरीच कारण आहेत ज्यामुळे लोक आपला आहार योग्य वेळेवर घेऊ शकत नाहीत, कोणाला आपल्या कामामुळे योग्य वेळेवर आहार घेता येत नाही तर कोणाला आपल्या पोटाच्या समस्येमुळे आहार घेता येत नाही. मित्रांनो भोजन हे आपल्या साठी सर्वात महत्वाचे आहे.

अजून आणखी काही करणे आहेत ज्याच्या मुळे  आपल्याला योग्य तो आहार घेता येत नाही बदलेल्या जीवनशैली मुळे  मुलामध्ये भुकेचे प्रमाण कमी झाले आहे आई वडलांची डॉक्टर कडे ही तक्रार असते कि आमचा मुलगा/मुलगी इतर मुलांपेक्षा कमी जेवतो, योग्य आहार न घेतल्यामुळे मुलांना वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते.

आपल्यला भूक न लागण्याची समस्या आपण घरगुती पद्धतीने सोडूवू शकतो, सफरचंदा मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात त्याच बरोबर आपली भूक देखील वाढण्यास मदत करतात.  सकाळी व संध्याकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खा किंवा सफरचंदाचा जूस प्या यामुळे आपल्या रक्ताचे शुद्धीकरण होते व आपल्याला भूक लागल्याची जाणीव होते.

भूक वाढवण्यासाठी खालील साधे उपाय करा 

खजुराची चटणी बनवा त्यात लिंबाचा रस मिसळून रिकाम्या पोटी ही चटणी खा, असे केल्याने आपल्याला भूक लागेल

वेलची ही थंड असते वेलची आपल्या शरीरात गारवा निर्माण करते, वेलची चे दाणे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या हे पाणी थंड झाल्यावर प्या. हे पाणी औषधा सारखे काम करते ज्यामुळे आपली भूक वाढण्यास मदत होते.

आयुर्वेदामध्ये भाज्यांचे महत्व सांगितलेले आहेत. एक वाटी टोम्याटोचा रस घ्या त्यात एक चमचा आल्याचा रस व गाजराचा रस मिळवा. हे मिश्रण प्यायल्याने  आपली भूक वाढेल.

एक चमचा ओवा व चिमुटभर काळा मीठ वाटीभर पाण्यामध्ये मिसळून ते मिश्रण उकळून घ्या थंड झाल्यावर हे मिश्रण गाळून घ्या व हे मिश्रण प्या काही दिवस हे मिश्रण दिवसातून एकदा प्या असे केल्याने आपली भूक वाढेल.

एक चमचा मधामध्ये थोडी काळी मिरी मिक्स करून दिवसातून २ – ३ वेळा हे मिश्रण चाटत जा यामुळे देखील आपली भूक वाढेल.

लिंबू कापून घेऊन त्यावर काळ मीठ लाऊन ते खाल्यामुळे यामुळे आपली भूक न लागण्याची समस्या दूर होईल.

आणखी काही भूक वाढवण्याचे सोपे उपाय आहेत जसे एक ग्लास पाणी उकळून त्यात चिंच मिळवा चिंच मऊ झाल्यावर चिंच त्याच पाण्यात मिसळून घ्या व उरलेली चिंच काढा या चटणीत चिमुटभर मीठ, चीमुठ्भर काळी मिरी पावडर टाकून मिक्स करून घ्या आणि हया मिश्रणात पुन्हा पाणी मिसळून घ्या या पाण्याचे सेवन केल्यामुळे आपल्याला भरपूर भूक लागेल हा एक आयुर्वेदिक उपाय आहे.

पुदिन्याची चटणी व मधाचे मिश्रण आपली भूक वाढवते तसेच आपले पोट निरोगी ठेवते .पुदिना आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण करतो व आपल्या शरीराला रोगांपासून वाचवतो, आणि पोटा संबंधी समस्या दूर करतो, पुदिन्याची चटणी एक वाटी मधात मिळउन खाल्याने अपली भूक कमी लागण्याची समस्या दूर होईल

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

मलेरियाची, लक्षणे आणि निदान संबंधित माहिती(Symptoms and signs of Malaria)

मलेरियाची, लक्षणे आणि निदान संबंधित माहिती. १. दरवर्षी सुमारे 250 दशलक्ष मलेरियाच्या प्रकरणांची नोंद केली जाते. आणखी अवघड गोष्ट म्हणजे …

Read more