भाज्या | Healthiest vegetables information in Marathi

भाज्या:-

1.पालक :-

१. पालेभाज्यामध्ये सर्वात महत्वाची भाजी म्हणून पालकला ओळखले जाते .
२. पालकाची भाजी ही शरीरासाठी खूप उपयुक्त असते त्यामुळे पालकाची भाजीचे सेवन नियमित करावे .
३. पालक या पालेभाजे मधून शरीराला आवश्यक असणारे प्रोटीन्स , लोह, ए जीवनसत्व , तसेच अमीनो आम्ल भरपूर प्रमाणात मिळते .
४. पालकच्या भाजीमध्ये बीटा केरोटिन व्हिटामिन खूप प्रमाणत असते . हे व्हिटामिन डोळ्यासाठी खूप उपयुक्त असते .
५. पालक खाल्याने डोळ्यांच्या विकार कमी होतात .
६. पालक या पालेभाजेमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. त्यामुळे पालकाची भाजी खाल्याने रक्तातील लाल कणांची संख्या वाढायला लागते .

2.मेथी :-
१. थंडीच्या दिवसात मेथी ही मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. तसेच मेथी हि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते .
२. मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी मेथीचा फार उपयोग केला जातो . मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि ते पाणी दिवसभर प्यावे . असे जर महिनाभर केले तर मधुमेह बारा होण्यास मदत होते .
३. मेथीची भाजी आहारात नेहमी असावी कारण त्यामुळे रक्तशुद्धी होते तसेच पोट साफ राहते .
४. रोज सकाळी थोडी थोडी मेथी खाल्याने वायुविकार दूर होतात .
५. मेथी आणि सुंठेचे चूर्ण गुळात मिसळून दिवसातून दोनदा घेतल्यास आम्लवात दूर होतो.
६. मेथीची भाजी हि शक्तीवर्धक आहे .

3. वांगी :-
१. वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात तसेच ते लो कॅलरीज व लो मेदयुक्त असते .
२. १०० ग्रॅम वांग्या मधून ३५ कॅलरीज उर्जा मिळते .२ कॅलरीज उर्जा ही वांग्यातील फैटस स्निग्धपदार्धापासून मिळते .
३. वांगे हे लो कॅलरीज आहार असल्यामुळे वजन आटोक्यात आणण्यास मदत करते .
४. वांग्यामध्ये मैंगनीज या खनिजतत्वाचे प्रमाण अधिक असते .
५. वांगे हे कैन्सरचा धोका कमी करतात . तसेच वांगी हा तंतुमय पदार्धांचा उत्तम स्त्रोत आहे .
६. मुतखडे ,पित्ताशयातील खडे विकारांनी पिडीत असणाऱ्यानी रुग्णांनी वांगी खाऊ नयेत .

4. बटाटा :-

१. भाजलेला बटाटा खाल्याने बद्धकोष्ठता दूर होते .
२. शरीराच्या जळलेल्या भागावर कच्चा बटाटा किसून लावल्यावर त्याचा फायदा होतो .
३. पित्ताच्या आजारात कच्चा बटाटा लाभदायक ठरतो .
४. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी बटाटयाचे सेवन केल्याने रक्तदाब सामान्य राहतो .
५. दुखापतीमुळे कुठली त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा .

5. भेंडी :-
१. भेंडीत असलेले फाइबर हे रक्तातील शर्करचे प्रमाण नियंत्रित ठेवते .
२. भेंडीत असलेले यूगेनॉलमुळे डायबेटीज या आजारापासून बचाव होतो .
३. वजन कमी करण्यासाठी भेंडीचे नियमित सेवन करावे .
४. भेंडीमध्ये ‘सी’ व्हिटामिन असते जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते . हे आपली इम्यूनिटी सिस्टिम ची ताकद वाढवते .आणि सर्दी ,खोकला पासून बचाव करते .
५. शरीराला निरोगी बनवण्यासाठी आवश्यक असलेले लोह,फॉंसफोरस,सोडीयम यांसारखे घटक असतात .

6. दोडका :-
१. दोडक्याची भाजी आरोग्यासाठी हितकारक असते .
२. कवील झालेल्या व्यक्तीच्या नाकात दोडक्याचे २-३ थेंब टाकल्यास नाकातून पिवळा द्रव्य बाहेर येतो . या उपायाने कावीळ बरी होते .

7.बीट :-

१. रक्त वाढीसाठी अत्यंत उपयोगी .
२. बीट मध्ये किडनी आणि पित्ताशय स्वच्छ ठेवण्याची शक्ती असते .
३. रात्री झोपण्यापूर्वी १ किंवा १/२ ग्लास बीटचा रस आवश्य घ्या .

Leave a Comment