शुष्क त्वचेवर घरगुती उपाय -(Home remedies for dry skin)

जर आपली त्वचा शुष्क असेल म्हणजेच आपल्या त्वचेत (moisture) ओलावा नसेल तर तिला शुष्क त्वचा (ड्राय स्कीन) म्हणतात आणि शुष्क त्वचा जास्त करून थंडीच्या दिवसात होते. कारण थंडी मध्ये हवेमध्ये ओलावा असतो तसेच गारवा भरपूर असतो यामुळे चेहरा, हात तसेच पाया वरील त्वचेत कसावट येते आणि असे झाल्यमुळे त्वचेतून रक्त देखील येतो. शुष्क त्वचेसाठी घरेलू उपाय, या उपायांमुळे आपण आपल्या शुष्क त्वचेला ठीक करू शकता. जर तुम्ही या उपायांचा प्रयोग केलात तर आपल्या त्वचेतील प्राकृतिक (moisture) ओलावा परत येईल.

शुष्क त्वचेवर घरगुती उपाय : –

शुष्क त्वचेला आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी दुधाचा वापर करा यामुळे आपल्याला कोणतेही नुकसान होणार नाहीत. अर्धा कप दुधामध्ये Olive oil चे काही थेंब टाका आणि मग हे दुध एका बाटलीत भरून कापसाच्या बोळ्याने हे दुध आपल्या चेहऱ्यावर लावा. यामुळे आपल्या त्वचेत निखार येईल आणि आपल्या शुष्क त्वचेची समस्या दूर होईल. याचा वापर रात्री झोपण्याच्या आधी करावा असे केल्याने आपल्याला फायदा होईल.

शिसव तेलाचे खूप फायदे आहेत, जे आपल्या चेहऱ्याच्या रोग ठीक करण्यासाठी गुणकारी आहे. शिसव चे तेल किंवा सूर्यफुलाचे तेल हे दोन्ही तेल थोड्या थोड्या मात्रेत घेऊन दुधात मिळउन आपल्या चेहऱ्यावर, हात, पाय तसेच शरीरावर लावल्याने आपल्या त्वचेतील (moisture) ओलावा परत येईल. आपली त्वचा चमकदार होईल. जर आपल्याला यापैकी कोणतेही तेल भेटत नसेल तर आपण बदामाचे तेल व मध समान मात्रेत मिळउन त्वचेची मसाज करा आणि १५ मिनिटां नंतर ओल्या कापडाने पुसून घ्या, आपल्या शुष्क त्वचेत निखार येईल आणि त्वचेत (moisture) ओलावा येईल.

जर आपली त्वचा खूपच शुष्क झाली असेल तर त्यात हलकी आग होते, तर अशात २ चमचे व्हिनेगर म्हणजेच बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यात मिळवा आणि अंघोळ झाल्यानंतर हे मिश्रण शुष्क त्वचेवर लावा आणि थोड्या वेळाने आपल्याला फरक जाणवेल. हे काही सोपे उपाय आहेत यांचा आपल्याला फायदा होईल, एक चमचा तिळाचा तेल किंवा Olive oil मध्ये थोडी दुधाची मलई मिळउन ते फेटून घ्या आणि हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. १५ मिनिटां नंतर हलका मसाज करून चेहरा साफ पाण्याने धुऊन घ्या यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

Leave a Comment