माका | Maca (Bhrungaraj) Benfits In Marathi

1) माक्याला भृंगराज, केशंगना, भांगरा कडिंगर, मरकरा भांगरो, पितृप्रिय अशी भारतीय भाषेत नावे आहेत तर लॅटीनमध्ये त्याला “एक्लिप्टा इरेक्टा’ म्हणतात.

2) शरीरावर गोंदवून घेतल्यावर माक्याचा रस चोळतात, त्यामुळे रंग पक्का होतो.

3) जन्मतःच बालकाला कफ झाला असेल आणि तो जर बाहेर पडत नसेल तर माक्याच्या रसाचे दोन थेंब व मधाचे सहा, आठ थेंब एकत्र करून टाळ्याला लावल्यास कफ बाहेर पडून छाती मोकळी होते.

4) शरीरास सूज आल्यास ती कमी करण्यासाठी माक्याच्या रसात मिरपूड घालून अंगाला चोळतात.

5) माक्याचा रस व मिरपूड सात-आठ दिवस पोटात घेतल्यास काविळ बरी होते.

6) भाजलेला व्रण बरा होताना त्यास माक्याचा व काळ्या तुळशीचा रस एकत्र करून लावल्यास भाजलेल्याचा डाग रहात नाही व कातडीचा रंग मूळचा येतो.

7) माक्याच्या तेलाने केसांची वाढ होते.

8) अर्धशिशी थांबविण्यासाठी माक्याच्या रसात मिरी वाटून लेप देतात.

9) माक्याचा रस व बकरीचे दूध सारख्या प्रमाणात घेऊन उन्हात गरम करून नंतर नाकात घालावे. त्यामुळे अर्धशिशी ताबडतोब थांबते.

10) माक्याचा रस जो घेतो तो बलवान होऊन त्याला दीर्घायुष्य लाभते.

11) माक्याच्या रसाने हिरड्या मजबूत होतात.
12) माक्याची मुळं आणि पानं लिव्हर आणि गॉल ब्लडरच्या दोषांवर उपयुक्त आहे.

13) “टॅरॅक्सकम’ ह्या लिव्हर टॉनिक ऐवजी पानांचा रस टॉनिक म्हणून देतात.
14) माक्यात “इक्लेप्टाईन’ हे अल्कलॉईड असते.

15) गुरांना, कोंबड्यांना जखमा झाल्या, कानाजवळ फुगीरपणा आल्यास माक्याचा रस त्याला चोळतात.
16) हत्तीरोगावर ताज्या माक्याचा रस तीळाच्या तेलात खलून लावतात, त्याने सूज कमी होते.

Leave a Comment