केसात कोंडा झाल्यास

१. केसांत कोंडा झाल्यास कोरफडीचा गर केसांना १० मिनिटे लावून ठेवावा व त्यानंतर केस धुवावेत.

२. केसांत कोंडा झाला असल्यास दोन ऍस्प्रिनच्या गोळ्या कोणत्याही डँड्रफ शाम्पूमध्ये विरघळून घ्या. या शाम्पूने केस धुवा.

३. आवळा व शिकेकाईने केस धुतल्याने केसांतील कोंडा नष्ट होतो.

४. केसांच्या मुळांना लिंबाचा रस लावून २० मिनिटांपर्यंत ठेवावे. मग गार पाण्याने केस धुवावेत. कोंडा काढण्याचा हा सर्वात उत्तम उपाय आहे.

५. कोंडयासाठी कडुलिंबाचा व तुळशीचा पाला चटणीसारखा वाटून तो केसांना लावून ठेवावा व नंतर केस धुवावेत. कडुलिंबामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे कोंडा कमी होतो. तसेच गंधकाचे पाणीही केसांच्या मुळांना लावल्याने कोंडा कमी होतो.

६. कोंडयामुळे खाज सुटत असलेल्या केसांना कधीही तेल लावू नये. केस धुण्यासाठी औषधी शाम्पूच वापरावा. रोज नाही तरी आठवडयात २/३ वेळा केस धुऊन ते उन्हात वाळवावेत, हे केसांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

१०. खोबरेल तेलात कापूर टाकून केसांना मसाज केल्याने कोंडा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडत नाही.

Leave a Comment