मान, पाठ, कंबरदुखी | Neck, back, waist hurt in Marathi

– खड्डे, खाच खळगे यातून चालणे, वाहन चालविणे यामुळेही हा त्रास होतो.

– यामध्ये स्नायू दुखावल्यामुळे त्रास आहे की मणक्याच्या विकारामुळे त्रास आहे हे मूळ कारण जाणून घ्या.

– स्नायू दुखावल्यामुळे त्रास असेल तर वैद्याच्या सल्ल्याने त्या जागेवर स्थानिक स्नेहन, स्वेदन म्हणजे औषधी तेलाने मसाज करून औषधी काढ्याने शेकावे.

– कटीबस्ती, मन्याबस्ती हे उपचार करावेत. पोटातूनही औषधे घ्यावी लागतात.

– मणक्याच्या विकारांमुळे मान, कंबरदुखी असल्यास मानेचे, कंबरेचे काही व्यायाम, योगासने, औषधी तेलाचा मसाज, काढ्याचे शेक घ्यावेत.

– कटीबस्ती, मन्याबस्ती हे घ्यावेत, औषधी तेल, काढा यांचा बस्ती (एनिमा) घ्यावा. पोटातूनही गुग्गुळकल्पांसारखी औषधे घ्यावी लागतात.

Leave a Comment