डोळ्यांची फडफड आरोग्य बिघडल्याचे लक्षण

१. डोळ्यांच्या पापण्या फडफडत असल्यास अनेक जण शुभ संकेत मानतात. मात्र, पापण्या फडफडणे हा शुभ संकेत नसून त्याकडे आरोग्य बिघडल्याचे लक्षण म्हणून पाहायला हवे. महिलांना शक्यतो जास्त या समस्येला सामोरे जावे लागते.

२. डोळ्यांचा कोरडेपणा : बाईकवरून लांबचा प्रवास, खूप गर्दीच्या ठिकाणी जास्त वेळ थांबणे, कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर यामुळे डोळे कोरडे होतात. त्यामुळेही डोळ्याची फडफड होऊ शकते.

३. ताण : मुले असलेल्या नोकरदार महिलांवर मोठा ताण असतो. घरची कामे, मुलांची जबाबदारी आणि व्यावसायिक काम यात त्या कायम व्यस्त असतात. अशा स्थितीत झोपेसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. पुरेशी झोप नसल्यास डोळ्यांवर परिणाम होतो.

४. थकवा : कमी झोपेमुळे शरीर लगेचच थकते. आपण वेळेत जेवण केले, काम कमी केले, तरी थकवा जाणवत राहतो. डोळ्यात जळजळ होते. खूप वेळ हा त्रास होत असेल, तर डोळे फडफडतात. अशा वेळी झोपेला प्राधान्य देणे गरजेचे असते. डोळ्यांना शक्य तितकी विश्रांती दिली पाहिजे.

५. चष्मा : काही लोक दीर्घकाळ एकच चष्मा न बदलता वापरत असतात. ठराविक वेळेनंतर चष्म्याच्या काचा योग्य काम करत नाहीत. त्यामुळे डोळ्यांवर ताण येऊन समस्या निर्माण होऊ शकते.

Leave a Comment