नाकातून रक्त येणे

– कारणे :

१. नाकाला जखम होणे.

२. कष्टाचं काम

३. उच्च रक्तदाब.

४. उंचीवरच्या प्रदेशात जाणे.

५. नांक फार जोरानं शिंकरणे.

– नाकातून रक्त आल्यास काय करावे :

१. खाली बसावे.

२. थोडेसे पुढे झुकावे म्हणजे रक्त हे आपल्या घशात जाणार नाही.

३. थंड, ओला कपडा आपल्या नाकाखाली धरावा म्हणजे आपल्या नाकातील रक्तवाहीन्या आकुंचित होऊन रक्तस्त्राव थांबेल.

४. रक्त हे एकाच नाकपुडीतून येत असेल तर, त्या नाकपुडीच्या वरच्या भागात घट्ट दाबून धरावे.

५. दोन्ही नाकपुड्यांतून रक्त येत असेल तर, आपल्या नाकपुड्या किमान दहा मिनिटे दाबून धराव्यात.

६. तरीही रक्तस्त्राव चालूच राहिल्यास, आणखी दहा मिनिटे दाब द्यावा.

७. रक्तस्त्राव हा नाकाला थेट झालेल्या जखमेमुळं झाला असेल तर, केवळ हलकाच दाब द्यावा.

८. जोरदार रक्तस्त्राव चालूच राहिल्यास किंवा नाकातून वारंवार चालू राहिल्यास, एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Comment