मॅनिक्युअरचे फायदे

१. हातांचे आणि नखांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मॅनिक्युअर करणे आवश्यक आहे.

२. घरच्या घरीदेखील मॅनिक्युअर करता येते. यासाठी कात्री, पुशर, नेल फाईल, ऑरेंज स्टिक, क्लीनर नेलब्रश, गरम पाणी, सौम्य शॅम्पू, हायड्रोजन पॅरॉक्साईड, एक चमचा मीठ, एक चमचा लव्हेंडर तेल, कापूस आणि टब हे साहित्य गरजेचे आहे.

३. सर्वप्रथम टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यात शॅम्पू,, लव्हेंडर तेल घाला आणि त्यात हात दहा ते पंधरा मिनिटे बुडवून ठेवा. त्यानंतर नेल रिमूव्हरने नखांवरचे नेलपेण्ट काढून टाका. कोल्ड क्रीमने नखांना मसाज करा. त्यानंतर नखांवर वाढलेली कातडी काढून टाका आणि नखांना आकार द्या.

४. ऑरेंज स्टिकवर कापूस लावून त्यावर हायड्रोजन पॅरॉक्साईड घेऊन नखांच्या आतील भाग स्वच्छ करा. नखांवर थोडा वेळ हायड्रोजन पॅरॉक्साईड लावून ठेवा.

५. यामुळे डाग जाऊन नखे गुलाबी दिसतात. पुशरने नखांच्या कडेची घाण काढून टाका. त्यानंतर थंड पाण्याने हात धुवून नंतर कोरडे करा. त्यानंतर हातावर कोल्ड क्रीमने मालीश करा. या सर्व प्रक्रियेनंतर नखांवर नेलबेस लावून नेलपेण्ट लावा. नेलपेण्टचे तीन थर लावल्यास उत्तम परिणाम मिळतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *