बाटली व बूच धुण्याची पद्धती कशी असावी?

१) शक्यतो वाती चमच्याने वरचे दूध बाळाला पाजावे. काही कारणांमुळे शक्य नसल्यास बाटलीने दूध पाजण्यास हरकत नाही. बाटली व बूच दोन्ही साबण आणि ब्रशने स्वच्छ धुवावे.

२) बुचाचा चिकटपणा जाण्यासठी, बुचाला मीठ लावून ते चांगले चोळावे.एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यात बाटली व बूच उकळून घ्यावे.

३) बाटली उकळत्या पाण्यात टाकू नये. त्यामुळे ती फुटण्याची शक्यता असते. प्रत्येकवेळी बाळास दूध पाजल्यानंतर बाटली उकळून घ्यावी. शक्य असल्यास घरात १- २ बाटल्या बुचे जास्त असावीत म्हणजे ऐनवेळी अडचण येत नाही.

Leave a Comment