केसांचे वाढीसाठी घरगुती उपाय

१. केस आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवीन आणि सुंदर ओळख करून देण्यात नक्कीच मोलाचा वाटा उचलतात . लांब आणि आकर्षक केसांसाठी घरच्या घरी काही उपाय करता येतात.

२. कोरफडीच्या एका मोठ्या पानाला एका बाजूने चाकूने कापून त्यात मावतील इतके मेथीचे दाने भरावेत.

३. कोरफडीच्या गरातील पाण्यावरच मेथीच्या दाण्यांना चार दिवसांनतर छानपैकी मोड (कोंब ) येतील. नंतर कोरफडीचे लहान लहान तुकडे करून अर्धा लिटर खोबरेल तेलात मोड आलेल्या मेथीच्या दाण्यांसह उकळून घ्यावेत.

४. कोरफडीतील पाण्याचा अंश संपेपर्यंत मंद आंचेवर तेल उकळावे अन थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे.

५. रात्री झोपताना दिवसाआड केसांना लावावे .

६. मेथी व कोरफड युक्त तेलाने केस गळायचे थांबून हमकास वाढतातच.

७. केस वाढवण्यासाठी बटाट्याचा रस :

– केसांसाठी ताज्या बटाट्यांचा रस बनवण्यासाठी सर्वात अगोदर एक बटाटे सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करा.

– आता हे मिक्सरमधून बारीक करुन घ्या. बटाट्याची बारीक पेस्ट तयार करा. जर ही पेस्ट खुप घट्ट झाली असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी टाका.

– बटाट्याचा रस काढण्यासाठी एका कापडात ही पेस्ट टाका आणि गाळून घ्या. परंतु लक्षात ठेवा की, प्रत्येक वेळी ताज्या बटाट्याचा रस काढूनच त्याचा वापर करावा

८. बटाट्याचा रस असा वापरा :

– लांब, दाट केस मिळवण्यासाठी या रसाने टाळूवर हळुहळू मालिश करा. उरलेला रस केसांना लावून घ्या.

– आता हे शॉवर कॅपने झाकून घ्या आणि 20-25 मिनिटांने आपले केस पाण्याने धुवून घ्या. केस वाढण्यासाठी आठवड्यातुन एक वेळा हा उपाय करा. केस वाढवण्यासोबतच हा उपाय केसांना चमकदार बनवतो.

९. बटाट्याचा रस, मध आणि अंड्याचे मास्क :

– बटाट्याच्या रसामध्ये थोडेसे मध आणि अंड्याचे पिवळे बलक मिक्स करा. या मिश्रणाने टाळूची मसाज करा. असे करताना हे केसांच्या मुळांना लावा कारण हे केसांच्या रोम छिद्रांना सक्रिय करण्यात मदत करते.

– हे मास्क कमीत-कमी 30 मिनिट केसांना लावून ठेवा. यानंतर केस धुवून घ्या. हा उपाय नैसर्गिक रित्या केसांची देखरेख करतो.

– हा उपाय केल्याने केसांना कोणताच साइड इफेक्ट होत नाही. हे मास्क लावल्याने केसांना ओलावा आणि पोषण मिळते. यासोबतच केस जलद वाढण्यात मदत मिळते.

१०. बटाट्याचा रस केसांना लावल्याने कोणते फायदे होतात

– केसांची जलद वाढ

– केस चमकतात

– मध, अंडी आणि बटाट्याचा रस असल्यामुळे हे केसांना चांगले कंडीशनिंग करते.

– टाळूला निरोगी ठेवते

– कच्च्या बटाट्याने केस धुतल्याने केस मजबूत होतात. बटाट्यात भरपूर स्टार्च असल्याने केसातील अतिरिक्त तेल निघून जाते. अत्यंत स्वस्त व सहज उपलब्ध असणाऱ्या बटाट्याचे इतरही फायदे आहेत.

– बटाट्याचा रस केसांची लांबा वाढवण्यास मदत करतो. महिन्यातून दोनदा बटाट्याचा रस डोक्याला लावावा.

– केसांचा जुना रंग काढून नवीव रंग लावण्यापूर्वी केसांना बटाट्याचा रस लावा.

११. केस खूप गळत असतील तर खोबरेल तेलात मिसळून बटाट्याचा रस लावा.

१२. आपल्या दिनचर्येत या घरगुती उपायाचा वापर केल्याने तुम्ही सुंदर, दाट आणि निरोगी केस मिळवू शकता.

Leave a Comment