बालसंगोपन

१) बाळ जन्माला आल्यानंतर प्रथम काय करतात ?

२)बाळाचा जन्म झाल्यावर प्रथम त्याची नाळ कापतात. नाळ कापताना खूप काळजी घेणे आवश्यक असते. विळा, सुर, कात्री वगैरे जे सापडेल त्यानं नाळ कधीही कापू नये. नवीन ब्लेड व दोरा १५ मिनिटे पाण्यात उकळत ठेवावा.

३) निर्जंतुक केलेला दोरा घेऊन बेंबीपासून चार बोटं किंवा सुमारे २ इंच अंतरावर दोऱ्याने नाळ बांधून घ्यावी व नवीन ब्लेडने कापावी. नाळेवर हळद- कुंकू, बुक्का, राख पावडर असं काहीही लावू नये.

४) बाळ जन्माला आल्यावर रडलं म्हणजे काय समजतात?

५) बाळ जन्मत:च रडले पाहिजे. ते रडले म्हणजे त्याचे नवे जीवन सुरळीत झाले असे समजावे. कारण त्यामुळे त्याची श्वास घेण्याची क्रिया सुरु झाल्याचे लक्षात येते.

Leave a Comment