पिंपल्स घालवायचे उपाय-(Remedies For Remove Pimples)

पिंपल्स येणे हि एक सामान्य बाब आहे. ते कोणाच्याही चेहऱ्यावर येऊ शकतात, पण प्रत्येकजण स्वत: सुंदर दिसण्याचा प्रयत्न करत असतो. जेंव्हा आपल्या चेहऱ्यावर डाग, पिंपल्स होतात, तेंव्हा आपल्या चेहऱ्याच्या सुंदरतेत कमतरता येते. ज्यांची त्वचा तेलकट असते त्यांना पिंपल्स खूप वेळा येतात. जर ते पिंपल्स हाताने फोडले तर चेहऱ्यावर खड्डे पडतात.  चेहऱ्यावर पिंपल्स होण्याचा कारण म्हणजे आपला आहार घेण्याच्या पध्दती आणि आपल्या शरीरात वाढलेली गर्मी.

जर आपल्याला आपला चेहरा पिंपल्स रहित ठेवायचा असेल तर आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलायला हवेत. हिरव्या पालेभाज्या आणि पोषक तत्व युक्त आहाराचे सेवन केले पाहिजे. चेहऱ्या वरचे पिंपल्स घालवण्यासाठीचे उपाय खूप सोपे आहेत. पिंपल्स हे जास्त करून किशोरवयात (तरुणवयात ) होतात. या वयात एन्द्रोजन हार्मोन चा अधिक स्त्रवण होतो त्याचबरोबर टेस्टोस्टेरॉन, डीहाईड्रोटेस्टोस्टेरॉन (DHT) आणि डीहाईड्रोएपीईड्रोस्टेरॉन सल्फेट सारखे हार्मोन स्त्री व पुरुषांमध्ये उत्पन्न होतात, ज्यामुळे पिंपल्स येतात. चेहऱ्यावर रोम कूप च्या आत वासामय ग्रंथींची वाढ होते आणि मृत कोशिकांच्या मुळे त्या अजून वाढतात. यात कोणत्याहि सामान्य जीवाणू (propionibacterium acne) ची वाढ होऊ शकते. या जीवाणूंच्या संक्रमणामुळे पिंपल्स होतात.

आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घ्यायला हवी आणि वेळेवर आपल्या त्वचेला क्लीनअप , स्क्रब आणि मॉंइच्छराईज करायला हवे. यासाठी आपण आपला चेहरा कडुलिंबाच्या पाण्याने धुऊन घ्या. चेहरा धुउन झाल्यावर मॉंइच्छराईजर क्रीम लावा. आपल्या त्वचेच्या जरुरती नुसार आठवड्यातून चेहऱ्याची एक दोन वेळा स्क्रबिंग करा यामुळे आपल्याला फायदा होईल.

बेकिंग सोड्याच्या वापराने आपल्याला खूप फायदा होईल. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात मिसळवा आणि हा मिश्रण कापसाच्या बोळ्याला लाऊन हळू हळू आपल्या चेहऱ्या वर ज्या ठिकाणी पिंपल्स झालेत त्या ठिकाणी लावा. हे आपल्या चेहऱ्या वर कमीत कमी १० मिनिट लाऊन ठेवा आणि नंतर पाण्याने धुवून घ्या. असे दिवसातून दोन वेळा जरी केलेत तर पिंपल्स कमी होतील. जर आपल्या चेहऱ्या वर असे केल्याने झोंबत असेल तर चेहरा लगेच पाण्याने धुवून घ्या.

लिंबाचा उपयोग आपल्यासाठी फायदेमंद आहे कारण हे सोप आहे व कमी खर्चिक आहे. लिंबू कापून घ्या आणि कापलेला लिंबू पिंपल्स झालेल्या भागावर लावा. जर आपल्याला झोंबत असेल तर घाबरू नका कारण हा खूप चांगला उपाय आहे. कारण यात साईट्रिक एसिड असत आणि हे पिंपल्स तयार करणारे जीवानुना मारून टाकत. नंतर चेहरा धुवून घ्या. बाहेर जायच्या आधी सनस्क्रीन लाऊन बाहेर पडा कारण लिंबा मध्ये साईट्रिक एसिड असतो त्यामुळे आपला चेहरा झोंबू शकतो म्हणून सनस्क्रीन लावल्याने आपला चेहरा झोंबणार नाही.

कच्चा बटाटा जसा आपल्या आहाराचा स्वाद वाढवतो तसाच आपण याचा उपयोग पिंपल्स वर देखील करू शकतो, यामुळे आपल्याला होणाऱ्या त्वचा रोगांवर कारगर ठरतो. यासाठी बटाटा कापून ज्या ठिकाणी पिंपल्स झालेत त्या ठिकाणी लावा. बटाटया मध्ये असलेले एन्टी-इनफ्लामेंटरी  गुण जखम भरण्यास मदत करतात. बटाटा आपल्या चेहऱ्या वर ५ ते १० मिनीटान साठी तसेच ठेवा आणि थंड पाण्याने धुवून घ्या. असे आपण आठवडाभर करत असाल तर आपल्या चेहाऱ्यावरचे पिंपल्स जातील व आपला चेहरा चमकदार होईल.

चहा पिणे सगळ्यांनाच आवडते, पण चहाच्या पानांचा तेल खूप गुणकारी औषध असतो. यामुळे अनेक रोग ठीक होतात. चहा च्या पानांचा तेल एक चांगला जीवाणू रोधक म्हणून ओळखले जाते. याच्या वापराने कोणताही दुष्प्रभाव होणार नाही.

तुरटी चा उपयोग जास्त करून पाणी साफ करण्यासाठी किंवा जखम साफ करण्यासाठी करतात. पण एवढेच नाही तर यामुळे आपला चेहरा सुंदर बनवण्यासाठी उपयोग होतो. तुरटी एक एन्टी सेप्टिक आहे. यामुळे तुरटी आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स वर प्रभावी पणे कार्य करते. जर आपण पिंपल्स वर तुरटी लावत असाल तर याचे काही दुष्परिणाम आहेत, कारण तूरटीच्या सारख्या वापराणे पिंपल्स वाढू शकतात, म्हणून तुरटी चा वापर दिवसातून केवळ एक वेळा करा.

ऍपल (सफरचंद) सिरप पण आपल्या त्वचेसाठी फायदेमंद आहे. जर आपण ऍपल सिरप चा उपयोग करत असाल तर आपल्या चेहऱ्यावर जखमी झालेल्या मृत कोशिका काढून टाकून पिंपल्स दूर करण्यास मदत करतात . हा सिरप आपल्या चेहऱ्यावर कमी मात्रेत लावा कारण याचा जास्त उपयोग आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतो. ऍपल सिरप चा उपयोग करण्यासाठी हा सिरप आपण पाण्या सोबत मिसळून लावा, काही वेळासाठी तसाच ठेवा आणि १० मिनिटा नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. असे केल्याने पिंपल्स दूर होतील. तेलकट व चरबीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. आईंस्क्रीम, चॉकलेट, पिझ्झा, केक यांच्या सेवनाने समस्या वाढेल. साखर व शुद्धपीठाने बनवलेले खाद्य पदार्थ खाऊ नका. क्षारवाले  फळांचा वापर जास्त करा. खरबूज, अंकुरित धान्यांचा सेवन करा. मध आपल्या साठी खूप उपयोगी आहे, कारण मध हा एक प्राकृतिक जीवाणूरोधी आहे, ज्यामुळे अनेक रोगांपासून आपला बचाव होतो. मध आपल्या चेहऱ्यावर रात्रभर लाऊन ठेवा आणि सकाळी चेहरा धुवून घ्या आपल्याला फायदा होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपचार-(Home remedies to eliminate white hair problems)

जर आपण केसांच्या समस्ये मुळे त्रस्त असाल तर या समस्ये वर काही उपाय जाणून घेऊया :

आवळा-आवळा हा फळ जरी छोटा असला तरी खूप गुणकारी आहे. आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. तसेच आवळ्याचा नियमित पणे वापर केल्याने त्याचा आपल्या केसांसाठी देखील फायदा होतो. आवळ्याचा वापर फक्त आहारात न करता आवळा मेहन्दीत मिळवून केसांमध्ये लावा. तसेच आवळा कापून त्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि नारळाचे तेल थोडे गरम करून त्यात हे तुकडे टाका व केसा मध्ये लावा आपल्याला फायदा होईल.

black tea (काळा चहा) व coffee :

जर आपल्याला आपले केस काळे करायचे असतील तर black tea व cofee च्या अरक ने केस धुवा, असे आठवड्यातून तीन वेळा करा.

एलोवेरा (कोरफड ) :

जर आपण पांढरे केस व केस गळती पासून त्रस्त  असाल तर केसात एलोवेरा जेल  आणि लिंबा चा रस मिळवून केसांमध्ये लावा.

तूप :

जर आपले केस सफेद होत असतील तर केसांची तुपाने मालिश करा. आपल्या सफेद केसांची समस्या दूर होईल.

दही :

जर आपल्याला केस प्राकृतिक रूपाने काळे करायचे असतील तर दहीचा वापर करा. दही मध्ये मेहंदी बरोबर मात्रेत मिळवा आणि हे मिश्रण केसांमध्ये आठवड्यातून एकवेळा लावा आपल्याला फायदा होईल.

 कडीपत्ता :

जर आपले केस पांढरे होत असतील तर कडीपत्ता आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे. कडीपत्याची पाने एका तासासाठी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्या पाण्याने केस चांगल्या प्रकारे धुवून घ्या किंवा कडीपत्याची पाने कापून गरम खोबरेल तेलात मिळवून लावा, याचा आपल्याला फायदा होईल.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

नाक वाहण्याच्या समस्येवर उपचार-(Remedies for a Runny Nose )

थंडीच्या दिवसात जेंव्हा नाक वाहू लागते तेंव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, यामुळे आपल्याला नीट झोप लागत नाही. आपले कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नाही आणि यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होतो. या समस्येवर काही घरगुती उपचार आहेत. यांच्या उपयोगाने आपले वाहते नाक ठीक होईल व आपल्याला बरे वाटेल.

वातावरणात झालेल्या बदला मुळे होणारया आजारांवर हळद खूप फायदेमंद आहे. सर्दी मध्ये हळद जाळून तिचा धूर घ्या, यामुळे आपल्याला तत्काळ आराम मिळेल. जर सर्दी मुळे आपले नाक बंद असेल तर दालचिनी, काळी मिरी, इलायची आणि जीरा  समान मात्रेत घेऊन एका सुती कापडात बांधून घ्या आणि याचा वास घ्या यामुळे आपल्याला खूप फायदा होईल. थंडीच्या दिवसात आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते जसे सर्दी, खोकला आणि नाकातून पाणी येणे म्हणजेच नाक वाहणे या समस्याना सामोरे जावे लागते. सर्दी एक सामान्य आजार आहे पण वेळेवर उपचार नाही घेतला तर हा आजार गंभीर होऊ शकतो. सर्दी मुळे ताप येणे, डोके दुखी व अंग दुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सर्दी मुळे आपला नाक कधी कधी बंद होते ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि आपल्याला काम करताना देखील समस्या होतात. जेंव्हा आपला नाक बंद होते तेंव्हा खूप त्रास होतो. ताप येणे, अंगदुखी होते  यामुळे याच्यावर पक्का उपाय करणे आवश्यक आहे. जर आपल्याला याच्यावर उपचार करायचा असेल तर आपल्याला घरात उपलब्ध असलेल्या काही वस्तूंचा उपयोग करायला हवा ज्यामुळे आपल्याला लवकर आराम मिळेल.

लसुन चा उपयोग करून आपण स्वतः उपचार करू शकतो. लसनामध्ये एन्टीबायोटीक गुण असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद असतात. जर कोणाचा नाक सर्दी मुळे बंद झाला असेल किंवा नाकातून पाणी येत असेल तर यासाठी लसुन खूप फायदेमंद आहे. आपण लसणाच्या पाकळ्या व हळदी पूड पाण्यात उकळून घ्या, हे शिजल्यावर थंड होऊन द्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा. असे केल्याने आपली बंद नाकाची समस्या दूर होईल आणि जर नाकातून पाणी येत असेल तर ते हि थांबेल.

सगळ्यात सोपा उपाय म्हणजे मिठाच्या पाण्याने गरारा करा. कारण यात लवणीय गुण असतो. हा उपाय करण्यासाठी १ कप कोमट पाण्यात १ चमचा मीठ टाकून तो घोळून घ्या, या पाण्याने ३० सेकंदा साठी गरारे करा, आपल्याला आराम मिळेल. यामुळे नाक वाहण्याची समस्या दूर होईल, आपल्या घशाची खव खव देखील दूर होईल.  नाक वाहण्याची समस्या दूर करण्यासाठी आपण राईच्या तेलाचा वापर करा. राईच्या तेलाचा वास खूप प्रभावी असतो. राईच्या तेलाचा वास घेतल्याने आपली नाक वाहण्याची समस्या दूर होईल आणि आपल्याला श्वास घ्यायला त्रास होणार नाही तसेच आपले नाक साफ होईल.

१. एक चमचा राईचा तेल वाटीत घेऊन १० सेकंद मायक्रोवेव मध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर एक एक थेंब आपल्या नाकात टाका यामुळे आपल्याला खूप फायदा होईल.

२. दोन चमचे सुक्या ओव्याचा बारीक चुरा करा आणि साफ फडक्यात बांधून ठेवा. हि पोटली नाकावर ठेवून श्वास घ्या, जेंव्हा जेंव्हा नाक वाहेल तेंव्हा हि पोटली नाकावर ठेऊन श्वास घ्या.

३. एका कपात १ ते ४ चमचे हळद टाका व एक कप पाणी उकळून घ्या.  या पाण्यात हळद मिळवा आणि १० मिनीटानंतर हळद गाळून घ्या आणि हा पाणी प्या. जो पर्यंत आपली नाक गळण्याची समस्या दूर नाही होत तो पर्यंत असे दिवसातून २ वेळा  पाणी प्या, यामुळे आपल्याला आराम मिळेल.

४. आळ्यामध्ये खूप सारे ऐन्टिसेप्टिक गुण असतात. जर आपण आलायुक्त चहाचे सेवन कराल तर आपल्याला खूप फायदा होईल . एक कपात ३ तुकडे आल्याचे टाका आणि एक कप गरम पाणी टाका, याच्यात दालचिनी पण टाका आणि हे चांगल्या प्रकारे उकल्यावर हे पाणी गरमा गरम प्या यामुळे आपला वाहणारा नाक ठीक होईल आणि आपल्या घश्या संबंधी आजार देखील ठीक होतील. असे दिवसातून कमीत कमी २ ते ३ वेळा करा, आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

५. मेथीच्या फायदयनबद्दल आपल्याला माहिती असेलच. याचा उपयोग बऱ्याच काळा पासून होत आहे. मेथी मध्ये खूप सारे औषधी गुण आहेत याच्यात आयन ची मात्रा खूप असते आणि आयन आपल्या शरीरासाठी फायदेमंद असते. जर कोणाला सर्दी जुकाम झाला असेल आणि यामुळे नाक बंद झाली असेल तर, किंवा नाकातून पाणी येत असेल तर, अश्यावेळी मेथी आपल्याला खूप लाभ पोचवते.

६. हळदीची पावडर पाण्यात मिसळवून उकळून घ्या आणि थंड झाल्यावर याचे सेवन करा आपल्याला फायदा होईल.

साधारणतः सर्दी हि १ आठवड्यात ठीक होते पण खाण्या-पिण्याच्या सवई मुळे सावध राहिले पाहिजे. जर सर्दी झाली असेल तर याच्यावर उपचार घेतले पाहिजेत. घटसर्प झाल्यावर अमलतास च्या काढ्याने गरारा करा असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. तुळस आणि आल थंडी मध्ये लाभदायक असते . तुळशी मध्ये खूप उपचारी गुण असतात, हे जुकाम आणि ताप यामध्ये खूप कारगर असते आणि नाक वाहण्याच्या समस्येवर देखील फायदेमंद आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

दारू सोडण्याचे उपाय-(How to Treat Alcoholism)

दारूची नशा हि जगभरात विषाप्रमाणे मानली जाते व सगळ्यात जास्त घातक मानली जाते. एका सर्वे नुसार दारूमुळे दरवर्षी जगभरात ४० लाखाहून अधिक लोकांचा मृत्यु होतो. एड्स, टीबी यांसारखे घातक आजार तसेच जगभरात होणाऱ्या हिंसा यांच्या तुलनेत दारूमुळे होणारा मृत्यु दर जास्त आहे. दर दिवशी होणाऱ्या १८ मृत्यू पैकी १ मृत्यू हा दारूमुळे होतो आणि जगभरात होणाऱ्या गाड्यांच्या अपघातात सर्वात जास्त अपघात हे दारू च्या नशे मुळे होतात.

दारू सोडण्याचे उपाय

(WHO) World Health Organization च्या अनुसार जगभरात दर १० सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू  दारू मुळे होतो. जगभरात मृत्यू पावणाऱ्या लोकांमध्ये ६% लोकांचा मृत्यू दारूमुळे होतो. वैज्ञानिकांच्या नुसार २०० अधिकहुन आजार हे केवळ दारूमुळे होतात. आणि जास्त दारू पिण्यामुळे लिव्हर कॅन्सर व लिव्हर सिरोसीन होतो जे हे खूप घातक व गंभीर असतो. त्याच बरोबर निमोनिया, एड्स, टीबी आणि नपुंसक होण्याचा धोका दारू पिण्याने वाढतो. दारू चा आपल्या स्मरणशक्ती आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो.  जे लोक दररोज दारू पितात त्यांना डोळ्यांनी कमी दिसू लागू शकते. तसेच आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

दारू महिलांसाठी देखील खूप धोकादायक आहे. जास्त दारू पिण्याने त्यांची प्रजनन क्षमता कमी होते आणि त्यांच्या होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होतो. तसेच ते बाळ कमजोर, मानसिक रूपाने दुर्बल आणि इतर आजारांनी ग्रस्त होतात. दारू मुळे महिलांना मलाशय आणि ब्रेस्ट कॉन्सर चा धोका वाढतो त्यामुळे महिलांनी दारू पिऊ नये.

तसेच दारूमुळे अनेक वाईट गोष्टीना बढावा मिळतो. कारण दारू पिल्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीचा भान राहत नाही, ती व्यक्ती दारूच्या नशेत असते, त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टी मध्ये फरक समजत नाही. दारू मुळे अनेक अपराध घडतात. दारूच्या नशेमुळे घरगुती हिंसा, बलात्कार, मारामारी आणि आत्महत्या यांसारखे अपराध वाढतात. जे लोक आर्थिक दृष्ट्या कमजोर असतात आणि त्यांना जर दारू पिण्याची सवय असेल तर त्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. परिवारात वाद विवाद होतात दारू पिण्याने परिवार नाश पावतात, म्हणून दारू पिणे खूप घातक आहे.

दारू सोडण्याचे उपाय सोपे आहेत. आणि हे उपाय केल्याने आपल्याला खूप फायदा होईल आणि आपण निरोगी आयुष्य जगाल. सफरचंदाचा ज्यूस रोज प्या आणि जेवताना सफरचंद खाण्याने दारू पिण्याची सवय कमी होते. जर उकडलेले सफरचंद दारू पिणाऱ्या माणसाला रोज दिवसातून २ ते ३ वेळा खायला दिल्याने त्याची दारू पिण्याची सवय कमी होईल.

गाजर चा रस पण दारू सोडवण्यासाठी खूप फायदेमंद आहे. गाजर चा रस दारू पिणारी व्यक्ती जर रोज पीत असेल तर त्याची दारू पिण्याची सवय कमी होईल. आणि गाजराचा रस पिल्यामुळे आपल्या डोळ्यांना  फायदा होईल. यामुळे आपला पचन तंत्र देखील ठीक होईल. आपल्याला दारू पिण्याची सवय असेल तर रोज गाजराचा रस प्या आपल्याला फायदा होईल.

सगळ्यात चांगला उपाय म्हणजे ५०० ग्राम ओवा वाटून घ्या आणि ७ लिटर पाण्यात २ दिवसांसाठी भिजत ठेवा नंतर मंद आचेवर शिजवा, एवढा शिजवा कि पाणी २ लिटर पेक्षा कमी राहील आणि पाणी थंड झाल्यावर हे गाळून घ्या आणि बाटलीत भरून ठेवा आणि दारूची तळप लागल्यावर ५ चमचे पीत रहा जो पर्यंत आपली तळप जात नाही.

मनुक्याचे खूप फायदे आहेत. हे आपल्या रोगांना ठीक करण्यासाठी फायदेमंद आहे. जर कोणाला दारू सोडायची असेल तर त्याला  दारू पिण्याची तळप लागल्यावर मनुक्याचे एक दोन दाने तोंडात ठेऊन ते चुखा, तसेच मनुक्याचा रस बनवून पिऊ शकता यामुळे आपली दारू पिण्याची सवय कमी होईल. खजूर देखील दारू सोडवण्यासाठी खूप उपयोगी असते. यासाठी खजूर पाण्यात वाटून घेऊन या  मिश्रणाचे दिवसातून  २ ते ३ वेळा सेवन करा यामुळे आपली दारू पिण्याची सवय कमी होईल.

तंबाकू, गुटका , बिडी, सिगारेट इत्यादीचा नशा करणाऱ्या च्या शरीरात फॉंस्फरस तत्व कमी होतात. यासाठी फॉंस्फरस २०० चा प्रयोग करा आणि याच्या प्रयोगाने तंबाखु, गुटका , बिडी, सिगारेट च्या व्यतिरिक्त दारू ची पिण्याची सवय कमी होते. सोनारांकडे शुद्ध गंधक चा एसिड म्हणजेच सल्फुरिक एसिड ची दोन तीन थेंब दारू मध्ये मिळवा आणि आपल्याला दिसेल दारू पिणाऱ्या व्यक्तीची दारू पिण्याची सवय कमी झाली आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

तेलकट आणि शुष्क त्वचेवर उपचार-(Treatment on oily and dry skin)

महिला असो वा पुरुष प्रत्येक जण आपण जास्तीत जास्त सुंदर कसे दिसू याचा प्रयत्न करत असतात.  प्रत्येकाला वाटत असते आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसावेत आणि तेलकट त्वचा व शुष्क त्वचा नसावी. यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, डाग पडतात आणि या समस्येच्या निवारणा साठी बरेच लोक अनेक प्रकारचे कॉसमेटीक्स प्रोडक्ट्स चा वापर करतात. या प्रोडक्ट्स च्या वापराने आपल्याला काही काळा साठी फरक जाणवतो. पण हे कॉसमेटीक प्रोडक्ट्स खूप महाग असतात आणि यांचे आपल्या त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.

खूप सारे असे घरगुती उपाय आहेत ज्यामुळे आपण चेहऱ्याची तेलकट त्वचा व इतर समस्यांवर उपाय करू शकता. यामुळे आपली त्वचा सुंदर व बेदाग होईल, तेलकट पणा दूर होईल. जर आपली त्वचा तेलकट असेल किंवा शुष्क असेल तर याच्या वर वेग वेगळे उपचार आहेत. जर आपली त्वचा तेलकट असेल तर पिंपल्स, व्हाईटहेड्स, त्वचेत आग होणे सारखी समस्या होते.

काही लोकांसाठी हि समस्या निकाळी असते आणि अनुवांशिक असते. याच्या वर कितीही प्रोडक्ट्स चा वापर केल्याने जास्त फायदा होत नाही. याच्या वर काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार आहेत जे सोपे व कमी खर्चिक असतात. आपल्या त्वचेचा तेलकट पणा कमी करण्यासाठी काकडी, बटाटा हे एकत्र मिळवून आपल्या चेहऱ्यावर लावत असाल तर आपल्या त्वचेतील तेलकट पणा कमी होईल. लिंबाचा रस, पुदिन्याचा रस आणि मध हे तिन्ही एकत्र करून एक लेप तयार करा आणि हा लेप आपल्या चेहऱ्यावर लावा. आपली त्वचा चमकदार होईल आणि चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स कमी होतील.

चंदन एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. जर आपण चंदन, हळद आणि मुलतानी माती एकत्र करून लेप बनवून चेहऱ्यावर लावत असाल तर आपली तेलकट त्वचेची समस्या दूर होईल, कारण यामध्ये चेहऱ्यात असलेला ओलावा रोखण्याची क्षमता असते यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक चमक येते. आपली त्वचा चमकदार होते.

दहीच्या वापराने देखील आपली तेलकट त्वचेची समस्या दूर करू शकतो. यासाठी चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी दही लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. तसेच दही, तांदळाचे पीठ, बेसन आणि हळद मिळवून पेस्ट बनवा आणि हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे लावा यामुळे आपल्या त्वचेतील तेलकट पण दूर होईल आणि त्वचा चमकदार होईल. जर आपण हे घरगुती उपचार करत असाल तर आपल्याला खूप फायदा होईल.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

टोमॅटो खाण्याचे फायदे आणि त्यातील औषधी गुण-( Benefits of eating Tomato and its medicinal properties)

आज आपण टोमॅटो चे फायदे व त्याचे औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅटो मुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

कॅन्सर पासून बचाव – टोमॅटो मध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्स ची वाढ होऊन देत नाही. जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवनुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

रक्ताचे उचित संचार – जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून लाल गडद होईल.

डोळ्यांसाठी उपयुक्त – जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.

सांधेदुखी वर गुणकारी – टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.

वजन कमी करण्यासाठी – टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.

पोटातील जंत – जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून २ ते ३ दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला gas ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.

तर आपल्याला समजलेच असेल टोमॅटो हा किती गुणकारी आहे व यात किती औषधी गुण आहेत आणि आयुर्वेदात हि याच्या बद्दल लिहिले आहे. आपण स्वतःला तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा.   

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

जाडेपणा वर घरगुती उपचार-(Home remedies for weight loss)

जाडेपणा हि सगळ्यांसाठीच एक समस्या आहे यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचदा लोक आपल्यावर हसतात. जाडेपणा मुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. आपल्या शरीरात मोठ्या प्रमाणात चरबी साठल्यामुळे आपण जाडे होतो. आज आपण जाडेपणा वर घरगुती उपचार पाहूयात ज्यामुळे आपला वाढलेला वजन कमी करण्यास मदत होईल. आपली खराब जीवनशैली, आपल्या खाण्या पिण्याच्या सवई उदा. जास्त वसायुक्त (fatty) पदार्थ खाणे, जास्त प्रमाणात दारू पिणे, शारीरिक श्रम कमी करणे,  तेलकट पदार्थ खाणे, व्यायाम न करणे, कमी झोपणे आणि अनुवांशिक तसेच हार्मोनल समस्यांमुळे पोटाची चरबी वाढणे यामुळे आपण जाडे होतो.

जाडेपणा वर उपचार करणे आवश्यक आहे कारण यामुळे आपल्याला इतर आजार देखील होतात उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदया संबंधी विकार इत्यादी आणि या समस्या निवारणासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत व आपल्या खाण्या पिण्याच्या सवई मध्ये बदलाव करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपल्याला नियमित व्यायाम व योगा करणे आवश्यक आहे. कारण असे केल्यामुळे आपण निरोगी व तंदुरुस्त होऊ तसेच याच्यावर काही घरगुती उपचार देखील आहेत.

लाल मिरची  – कदाचित आपल्याला माहित नसेल लाल मिरची जाडेपणा कमी करण्यासाठी उपयोगी आहे. तसेच आपला वजन कमी करण्यासाठी फायदेमंद आहे. कारण लाल मिरची मध्ये Capsaicin हा एक घटक तत्व असतो जो आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी नष्ट करतो जे उर्जा खपत वाढवण्यासाठी जरुरी असतो. ज्यामुळे आपली क्रिया पण ठीक राहते. रोज आपण लाल मिरची चा चहा बनवून प्या असे आपण काही दिवसांसाठी करा.  एक ग्लास पाण्यात थोडी लाल मिरची टाका आणि चहा बनवा आणि हळू हळू याची मात्रा १ चमचा एवढी वाढवा आणि जास्त लाभासाठी याच्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. असा चहा रोज कमीत कमी १ महिन्यासाठी प्या. तसेच आपल्या जेवणात आलं , काळी मिरी, राई यांचा वापर करा असे केल्याने आपल्याला फायदा होईल.

लिंबू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेमंद आहे. लिंबाचा रस आपला जाडेपणा कमी करण्यासाठी खूप फायदेमंद असतो. याच्यामुळे आपली पचन क्रिया ठीक होते आणि विषहरण ची प्रक्रिया वाढवतो, ज्यामुळे आपली पचन क्रिया मजबूत होते. म्हत्वाचे म्हणजे जाडेपणा कमी करण्यासाठी आपली पचन क्रिया चांगली असणे आवश्यक आहे. कारण यामुळे आपली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी पोषक तत्व प्रदान करतात आणि याच्यात आपला मेटाबोलीज्म कमी करणारे विषाणू पदार्थ शरीरातून बाहेर काढतात. ३ चमचे लिंबाचा रस, १ चमचा मध आणि अर्धा चमचा काळी मिरी ची पावडर १ ग्लास पाण्यात चांगल्या प्रकारे मिळवून घ्या आणि रोज याचे सकाळी रिकाम्यापोटी सेवन करा. असे आपण ३ – ४ आठवड्यांपर्यंत करा आपला जाडेपणा कमी होण्यास मदत होईल.

एलोवेरा (कोरफड ) जसा आपल्या केसांसाठी व त्वचेसाठी फायदेमंद असतो तसाच आपला जाडेपणा कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे. कारण हा आपल्या मेटाबोलीजमला (चयापचयन)  उत्तेजित करतो आणि उर्जेची खपत वाढवतो आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतो. याच्यात नैसर्गिक कॉलेजन प्रोटीन असतात जे शरीरातील प्रोटीन सोखण्यासाठी ज्यादा मेहनत करून घेतात. ज्यामुळे पचन तंत्र क्रिया तंदुरुस्त होते आणि पोटातील विषाणू पदार्थ देखील बाहेर निघतात. ज्यामुळे आपल्या शरीरात रोग होण्याही शक्यता कमी होते. याच्यासाठी आपल्याला एक ताजा एलोवेरा (कोरफड )चा पाना मधून त्याचा गर काढा आणि त्याच्यात एक कप पाणी मिळवा किंवा संत्राच्या रस किंवा द्राक्षांचा रस देखील मिळवू शकता. आणि एलोवेरा ४ मिनिटांसाठी असेच राहूद्या आणि नंतर याचे सेवन करा असे केल्याने आपल्याला लवकर फरक जाणवेल.

सफरचंद आपल्याला अनेक प्रकारे फायदा पोचवतो जर आपण apple vinegar चा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणा कमी करण्यास मदत होईल. याच्यासाठी आपण एक कच्या सफरचंदाचा vinegar करू शकता यामुळे जाडेपणा कमी होतो आणि आपल्याला त्वरित उर्जा मिळते.  यामुळे आपल्या शरीरात वाढलेली चरबी नियंत्रणात राहते. एक चमचा apple vinegar एक ग्लास पाण्यात मिळवा आणि याचा सेवन आपण रिकाम्या पोटी करत असाल तर आपली चरबी कमी होईल.

आपण एक चमचा apple vinegar आणि एक लिंबाचा रस एक ग्लास पाण्या सोबत मिळवून देखील सेवन करू शकता हे देखील आपल्या साठी फायदेमंद ठरेल. apple vinegar चा उपयोग उचित मात्रेत करा कारण याच्या जास्त सेवनाने आपल्या शरीरातील पोट्याशियम चा स्थर व हाडांमधील खनिज पदार्थान मधील घनत्व कमी होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणून apple vinegar चा वापर योग्य मात्रेत व योग्य त्या सल्ल्याने करा.

मध आणि दालचिनी आपल्यासाठी खूप फायदेमंद आहे जर आपण याचा उपयोग करत असाल तर आपल्याला जाडेपणाची समस्या कमी होऊ शकते. कारण यापासून बनवलेला चहा पिण्याने आपला मेटाबोलीजम चांगल्या प्रकारे चालतो. उर्जा वाढते व शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर पडतात आणि आपली पचन क्रिया चांगली होते. ज्यामुळे आपण जेवण चांगल्या प्रकारे पचवू शकतो. हा एक चंगला उपाय आहे.

दालचिनी इन्सुलिन शी लढून भूक कमी करतो ज्यामुळे आपल्याला भूक कमी लागते. याच्यासाठी १ कप गरम पाणी घ्या त्यात अडीच चमचा दालचिनी पावडर मिळवा आणि त्यात एक चमचा शुद्ध मध मिळवा आणि यातील अर्धा मिश्रण सकाळी रिकाम्या पोटी खा आणि उरलेला अर्धा मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी घ्या हा आपला जाडेपणा कमी करण्यासाठी एक सरळ व सोपा घरगुती उपाय आहे. आणि त्याच बरोबर नियमित व्यायाम व योग करणे तेवढेच आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

कावीळवर घरगुती उपचार-(Home Remedies on Jaundice)

कावीळ एक गंभीर आजार आहे. कावीळ हा लिव्हर च्या संबंधित आजार आहे. या आजारात रोग्याचे डोळे व शरीराचा रंग पिवळा पडतो, अजूनकाही बदलाव शरीरात होतात. जसे नखांचा रंग पिवळा होणे, लघवी पिवळी होणे. कावीळ हा साधारण आजार वाटतो पण कावीळवर लवकर उपचार नाही केले तर याचे गंभीर आजारात रुपांतर होते. ज्यामुळे रोग्याच्या जीवाला धोका पोचू शकतो. याच्यावर योग्य उपाय केले नाही तर हा एक खूप धोकादायक आजार ठरतो.

हा आजार शरीरातील रक्तात पित्ताची मात्रा अधिक मात्रेत वाढल्यामुळे होतो. रक्तात पित्तरस बिलरुबिन ची मात्रा वाढल्याने होतो. शरीरात पित्ताचे निर्माण यकृतात होतो. पित्त आपण जे भोजन खातो ते पचवण्याच्या हेतू, तसेच शरीराच्या पोषणासाठी खूप आवश्यक असतो. आपण केलेला भोजन शरीरात कुजण्यापासून रोखण्याचे काम करतो. याच्यामुळेच आपली पचन क्रिया चांगली राहते. जर असे होत नसेल तर कावीळ ने ग्रस्त झालो आहोत समजावे.

कावीळ होण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि कावीळ मुख्यतः तीन प्रकारची असते. पहिली हेमोलाईटीक जॉन्डीस : या मध्ये रक्तातील लालरक्त कणिका नष्ट झाल्यामुळे शरीरात बिलरुबीन वाढतो ज्यामुळे शरीरात रक्ताची कमी होते आणि कावीळ होते. दुसरा प्रकार : शरीरातील बिलरुबीन ड्यूडेनम मध्ये रक्त जाण्यास रोकतो ज्यामुळे कावीळ होते. तिसऱ्या प्रकारात कावीळ लिव्हरच्या सेल्स ला विषाणू संक्रमण ने नुकसान झाल्यामुळे होते.

कावीळीचे अनेक लक्षणे आहेत जसे डोळ्यांच्या रंग पिवळा होणे, अशक्तपण येणे, सतत ताप येणे, उलटी होणे, अंगदुखी, भूक न लागणे, लघवी पिवळी होणे, नखांचा रंग पिवळा होणे, मळमळने, बध्कोष्टता इत्यादी लक्षणे आहेत. कावीळ जास्तकरून वृद्धांना होतो. यामध्ये त्वचेवर जोरदार खाज सुटते.

कावीळीच्या रोग्याने कमीत कमी २ हिरव्या नारळांचा पाणी प्यावा. नारळ फोडल्यानंतर नारळाचे पाणी त्वरित प्यावे. असे केल्याने आपल्या लघवीचा रंग एका दिवसातच बदलेले. असे ४ – ५ दिवस केल्याने आपल्याला फरक जाणवेल.

कावीळीवर उपचार करण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. जास्तच वाढला असेल तर आराम करणे आवश्यक आहे. कावीळ झाल्यावर आहारात बदल करणे आवश्यक आहे. तसेच पथ्य पाळावे लागतात. कावीळ झाल्यावर संत्रा, लिंबू, नाशपाती, द्राक्ष, गाजर, बीट, उसाचा रस हे आपल्यासाठी फायदेमंद ठरेल.

कावीळ झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. शुद्ध पाण्यामुळे अनेक आजार बरे होतात. सगळे वासयुक्त पदार्थ जसे तूप, तेल, मक्खन, मलई कमीत कमी २५ दिवसांपार्यत खाऊ नका. तिखट खाण्याचे टाळा, मांस खाण्याचे टाळावे, जैतून च्या तेलाचा उपयोग करू शकता. आपल्या आहारात पालेभाज्या व फळांचा रस प्या. यामुळे आपल्याला पोषक तत्व मिळतात.

पित्त हा आपण केलेला आहार पचवण्यासाठी जरुरी आहे. पित्त आपण केलेला आहार आतड्यानमध्ये कुजून देत नाही. जर पित्त योग्य तरेने आतड्यात पोचत नसेल तर ग्यास (आंबटपणा ) सारखी समस्या होते आणि शरीरात विषारी तत्व एकत्र होतात.  मुळा च्या पानांचा रस चे सेवन देखील फायदेमंद ठरते. आपल्याला कावीळ झाली असेल तर आपल्या आहारात पर्याप्त मात्रेत प्रोटीन, विटामिन C, विटामिन B कॉम्प्लेक्स असावेत. पूर्णपणे स्वस्थ झाल्यावर देखील आपल्या आहारात निष्काळजी पणा करू नये. कारण योग्य व पोषक आहारामुळे आपण निरोगी राहतो.

आवळा हा कावीळ झाल्यावर खूप फायदेमंद ठरतो. ५० ग्राम आवळ्याचा रस, २ ते ३ मिलीग्राम तुळशीच्या रसा मध्ये मिळवा. आणि याच्या जूस बनवा आणि या जूस चे सेवन सकाळी लवकर करा. २ ते ३ दिवसात आपल्याला फरक जाणवेल. तसेच आपल्या पोटा संबंधी समस्या देखील दूर होतील. जर आपण सकाळी व संध्याकाळी उसाचा रसात लिंबू पिळून पीत असल तर आपल्याला फायदा होईल. कावीळ झाल्यावर दहीचे सेवन करणे फायदेमंद असते कारण कावीळ बरा करणारे चांगले bacteria दही मध्ये असतात.

दही आपल्या शरीराला डिटॉक्सीफाई करतो. टरबूज, केळा, अननस, संत्रा, मोसंबी या फळांचा सेवन जरुर करा आणि आहार नियंत्रित मात्रेत करा. कांदा देखील कावीळ झाल्यावर फायदेमंद आहे. कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिळवून किंवा कांद्यावर लिंबू पिळून सकाळी सलाड प्रमाणे सेवन करा. कावीळ चे लक्षण दूर होतात. धन्याचे १० ग्राम बिया रात्री पाण्यात भिवून ठेवा, सकाळी हा पाणी गाळून प्या या पाण्यामुळे लिव्हर मधील सारे टॉक्सिन्स दूर करेल व आपल्याला आराम मिळेल, त्याचप्रकारे बार्ली चा पाणी पण लिव्हरला डिटॉक्सीफाई करतो आणि कावीळ मध्ये आराम मिळतो. रोग्याला मुळा च्या पानांचा जूस चे सेवन करायला हवा. जर आपल्याला आराम मिळत नसेल तर डॉक्टर कडे जाणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

ऍलर्जी वर घरगुती उपचार-(Home remedies on allergy)

आपला शरीर खूप संवेदनशील असतो. आपल्या शरीरात काही खूप अतिसंवेदनशील अंग असतात. उदा. नाक, कान, डोळे, त्वचा हे अंग आहेत ज्यांच्यात ऍलर्जी लगेच होते. ऍलर्जी चे अनेक प्रकार आहेत आणि हि अनेक कारणांमुळे आपल्या शरीरात होते. याचा मुख्य कारण प्रदूषित हवा. आपला वातावरण खूप जास्त प्रदूषित झाल आहे. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये सूज, नाक, कान, घश्याचे आजार, अस्थमा इत्यादी खूप वाढले आहेत. ऍलर्जी मुळे चर्म रोग पण होतात. यामुळे त्वचा लाल होते, त्वचेवर पुळ्या होतात. जर आपल्याला देखील श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा सारखी सारखी खाज सुटत असेल, पुळ्या उठत असतील, सारख्या सारख्या शिंका येत असतील तर हि काही ऍलर्जी ची लक्षणे आहेत.

आपल्याला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायला हवे ऍलर्जी ची काय करणे आहेत? आणि त्याच्यावर कोणते घरगुती उपचार आहेत? ऍलर्जी शरीरात अनेक प्रकारे होते आणि ऍलर्जी होण्याचे खूप कारण आहेत. हवेमधील प्रदूषण, संक्रमण यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होते. धूळ, माती आपल्या नाकात जाण्याने शिंका येतात हि देखील एक ऍलर्जी आहे. तसेच वातावरणात होणारे परिवर्तन याच्यामुळे देखील ऍलर्जी होते. तर कोणाला मधमाशांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते, काही प्राण्यांना स्पर्श केल्याने देखील ऍलर्जी होते उदा. कुत्रा, मांजर. काही औषधांमुळे देखील ऍलर्जी होते. म्हणून ऍलर्जी वर घरगुती व डॉक्टरी उपचार करणे आवश्यक आहे.

ऍलर्जी ची लक्षणे जाणन्या साठी आपल्याला काही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. ऍलर्जी च्या लक्षणामध्ये नाक सुजणे, सर्दी खोकला कमी न होणे, आपल्या डोळ्यात जळजळ होणे, किंवा डोळ्यातून सारखा सारखा पाणी येणे, डोळे लाल होणे हि देखील ऍलर्जी ची कारणे आहेत. जर आपल्याला श्वास घ्यायला त्रास होत असेल, सारखा सारखा खोकला येत असेल तर हे दमा किंवा ऍलर्जी ची लक्षणे आहेत. काही लोकांना गर्मी च्या दिवसात, थंडी व पावसाळ्यात देखील त्वचेची ऍलर्जी होते. पुरळ उठणे, खाज येणे हि काही लक्षणे आहेत, नाक बंद होणे, खूप सर्दी होणे, सारखी सारखी शिंक येणे. हि देखील काही लक्षणे आहेत.

काही लोक एवढे संवेदनशील असतात त्यांना खाण्या पिण्याच्या वस्तूंमुळे देखील ऍलर्जी होते. काहीलहान मुले व वृद्धाना धन्यामुळे देखील ऍलर्जी होते. ज्यामुळे ते गव्हापासून बनवलेली चपाती देखील खावू शकत नाही. काही लोकांना दुध, अंडी, मासे या पासून देखील ऍलर्जी होते. याच्यावर डॉक्टरी सल्ला अवश्य घ्या. काहीना ऍलर्जी हि औषधांमुळे देखील होते, किड्यांच्या चावण्याने देखील ऍलर्जी होते तर काहीना ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटीक क्रीम लावण्याने देखील ऍलर्जी होते. ऍलर्जी मुळे आपले स्वास्थ खराब होतो. आणि पोट दुखी, उल्टी, अतिसार, गजकर्ण, खाज, नाक बंद होणे, पुरळ उठणे असे आजार उद्भवतात.

जर आपल्याला ऍलर्जी वर उपचार करायचा असेल तर आपण औषधांचा वापर करू शकता पण यामुळे आपली ऍलर्जी पूर्ण पणे जाणार नाही. ऍलर्जी साठी काही आयुर्वेदिक व घरगुती उपचार देखील आहेत. याच्या उपयोगाने आपण ऍलर्जी पूर्ण पणे घालवू शकतो. जर आपल्याला त्वचेत ऍलर्जी होत असेल तर कापूर आणि नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. याच्यासाठी कापूर थोडा घ्या आणि नारळाच्या तेलात मिळवून पेस्ट बनवा आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज सुटत असेल तिथे लावा, आपल्याला आराम मिळेल.

ऍलर्जी झाल्यावर मिठाच्या पाण्याने गरारा करण्याने आपल्या नाकात आणि तोंडात फसणारी धूळीचे कण आणि बल्गम बाहेर निघून जातो. ज्यामुळे आपल्या नाकाच्या ऍलर्जी ची समस्या दूर होते. याचा उपयोग करण्यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चिमटी सोडा चांगल्या प्रकारे मिसळा आणि या पाण्याचे सेवन करा असे केल्याने आपल्या शरीरातील ऍलर्जी जाईल. आणि नाकात होणारी ऍलर्जी कमी करण्यासाठी आल्याचा वापर करू शकता. कारण आल्यामध्ये एन्टीबायोटीक व एन्टी वायरल तत्व असतात जे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे आपल्या शरीरात ऍलर्जी होत नाही.

एक कप पाण्यात कापलेला आला, दालचिनीच्या सोबत थोडी लवंग मिळवा व ५ ते १० मिनिटांसाठी उकळवत ठेवा. जेंव्हा हा काढा तयार होईल तेंव्हा याच्यात मध मिळवून चहा सारखा घ्या. असे केल्याने आपली नाकाची ऍलर्जी दूर होईल. असे आपण दिवसातून कमीत कमी तीन वेळा करा आपल्याला आराम मिळेल. तसेच आपल्या घरात असलेले आल, काळी मिरी, तुळशीची पाने, लवंग व खडीसाखर मिळवून चहा बनवा आणि हि चहा पिण्याने आपल्याला ऍलर्जी पासून आराम मिळतो. यामुळे फक्त आपली ऍलर्जी ठीक होत नही तर आपल्याला ऊर्जा देखील मिळते यामुळे आपले इतर आजारांपासून देखील बचाव होतो.

एलोवेरा (कोरफड ) पण आपल्या त्वचा रोगांवर गुणकारी आहे. कारण एलोवेरा मध्ये जीवाणूरोधी व एन्टीब्याकटेरियल तत्व असतात. त्वचेवर होणारी खाज ठीक करण्यासाठी खूप जास्त उपयोगी आहे. एलोवेरा ची काही पाने वाटून घ्या आणि हे त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेवरील ऍलर्जी दूर होईल. याचा वापर आपण कमीत कमी दिवसातून दोन वेळा करा यामुळे आपल्याला फायदा होईल.

कडूलिंबा मध्ये खूप सारे आयुर्वेदिक गुण असतात याच्यात जीवनु नष्ट करण्याची शक्ती असते. कडूलिंबाची पाने रात्र भर भिजवून ठेवा आणि हि पाने सकाळी वाटून घ्या आणि आपल्याला ज्या ठिकाणी खाज होत असेल त्या ठिकाणी लावा असे केल्याने आपली ऍलर्जी दूर होईल. हे काही ऍलर्जी वर घरगुती उपचार आहेत याचा वापर आपण करू शकता.

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!

नख वाढवायचे घरगुती उपाय- (Grow Nails Faster Naturally At Home)

नख सुंदर दिसणे आणि त्यांना वाढवणे फॅशन समजले जाते, नखे हि कोरीव, सुंदर व थोडी मोठी असल्याने आपल्या हातांची शोभा वाढते. डॉक्टरांच्या अनुसार ज्यांची नखे चांगली असतात त्यांचे आरोग्य नेहमी चांगले असते. डॉक्टर पेशंट ची नखे पाहून देखील त्याच्या आजार बद्दल सांगू शकतात, नखे आणि सुंदर केसांमुळे महिला खूप सुंदर दिसतात. केस आणि नखे एकाच प्रकारच्या प्रोटीन पासून बनलेले असतात आणि त्या प्रोटीन चे नाव आहे केराटीन (Keratin). नखांची वाढ पटकन होते, नख दर महिन्याला १ इंचाच्या १० व्या भागाएवेढे वाढतात, कधी कधी नख वाढण्याचा वेग कमी होतो आणि हि चांगली बाब नाही आहे, जेव्हा आपल्या शरीरात कसली तरी कमी असते तेव्हा नख वाढण्याची गती कमी होते.

नखे हळूहळू वाढणे, नखे ठिसूळ होणे, नखांचे तुटणे यासाठी आपल्या जेवणात आलेला बदल कारणीभूत असू शकते. म्हणून पोष्टिक आहार आपल्याला या समस्येपासून वाचवू शकतो. आपण आपल्या नखांची योग्य देखभाल करायला हवी, ज्यामुळे आपली नख सुंदर व स्वस्थ बनतील.

नख वाढवायचे घरगुती उपाय

जैतून (olive) च्या तेलाचा वापर:  झोपण्या च्या आधी जैतून चे तेल गरम करून ५ मिनिटा साठी या तेलाने आपल्या नखांची मालिश करावी, १५ ते ३० मिनिटासाठी जैतून च्या तेलामध्ये नख बुडून ठेवा.

संत्र्याच्या रसचा उपयोग:  संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिटासाठी आपली नख बुडून ठेवा व नंतर गरम पाण्याने धुवा त्यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नखे चमकदार होतील.

लिंबाच्या रसाचा प्रयोग:  लिंबाचा रस व जैतूनचा तेल गरम करा. हे कोमट झाल्यावर १० मिनिटासाठी त्यात आपली नखे बुडवून ठेवा नाहीतर लिंबाचा तुकडा घेऊन ५ मिनिट नखांची मालिश करू शकता.

नारळाच्या तेलाचा प्रयोग: रात्री झोपण्या आधी नारळाच्या तेलाने आपल्या हाताची व नखांची मालिश करा ,यामुळे आपल्या रक्ताचा परीचारण चांगले होईल आपल्याला याचा खूप फायदा होईल, यामुळे आपली नखे वाढण्यास मदत होईल व नख चमकदार होतील.

 

जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स द्वारे आम्हाला प्रश्न विचारू शकता. आमचे तज्ज्ञ डॉक्टर्स तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करतील!!