डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक खाद्यपदार्थ

१) हिरव्या पालेभाज्या- हिरव्या पालेभाज्या पालकाची पातळ भाजी, कोबी, ब्रोकली इ भाज्यांमध्ये कॅरोटीनॉईड असते त्यामुळे डोळ्यांचा रेटीना चांगला राहतो.

२) कांदा, लसूण- लसूण आणि कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त असते. डोळ्यांसाठी ते antioxident चे काम करते.

३) सोया मिल्क-यात अधिक प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामध्येच फॅटी अॅसिड, जीवनसत्त्व-इ यामध्ये सुज कमी करण्याचे तंत्र असते.

४) अंडे-अंड्यामध्ये अमिनो अॅसिड, प्रोटीन, सल्फर लैक्टीन, ल्युटीन, सिस्टीन आणि जीवनसत्त्व ब-१२ असते. हे सर्व पेशींच्या कार्यात महत्त्वपूर्ण भुमिका बजावतात.

५) गाजर आणि ढोबळी मिरची रस- हिरव्या, लाल, पिवळ्या, नारिंगी रंगाच्या भाज्या आणि फळांमुळे खुप चांगल्या प्रकारचे पोषण मिळते. यामध्ये अ,क जीवनसत्त्व असल्यामुळे antioxident चे काम करतात व ते डोळ्यांचे संरक्षण करतात.

६) सुकामेवा- सुक्यामेव्यामध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्वाचे स्त्रोत आहेत. ज्यामुळे शरीरातील मेदाच्या पातळीचे प्रमाण कमी राखले जाते.

७) डेअरी उत्पादने- दुध, लोणी, मलई, चीज, पनीर या सर्व डेअरी उत्पादनांमध्ये जीवनसत्त्व-अ खुप प्रमाणात आढळते. जीवनसत्त्व-अ च्या कमतरतेमुळे अंधुक दिसायला लागते.

८) मासे-माश्यांमध्ये ओमेगा- ३ फॅटी अॅसिड असते. ज्या बारीक बारीक रक्तपेशिंना खराब होण्यापासून वाचवते. म्हणुन आठवड्यातून किमान दोनवेळा तरी मासे आहारात घ्यावेत.

Leave a Comment