दातदुखीवर घरगुती उपाय

१. आपल्यापैकी प्रत्येकाला दातदुखीचा त्रास कधीना कधी तरी झालेला असतोच. त्यात जर दातात किंवा हिरड्यांमध्ये पू झाला तर त्याची कळ मस्तकात जाते. दात किडल्याने या जंतूमुळे दातात किंवा हिरड्यामध्ये पू होतो.

२. दात किडल्यानंतरची ही पुढची स्थिती आहे. दात तुटला किंवा त्याचा तुकडा पडला तरीही हिरड्या किंवा दातात पू होऊ शकतो. दाताचे वरचे आवरण, ज्याला एनामल म्हणतात, ते उघडे पडल्यामुळे जंतूना दाताच्या खोलवर शिरकाव करण्यास वाव मिळतो. त्यामुळे हिरड्या किंवा दातामध्ये पू होतो, कधीकधी हा पू दाताच्या मुळातून हाडापर्यंत जाऊन पोचायची शक्यता असते.

३. पेपरमिंट तेल : या तेलात काही जंतुनाशक गुणधर्म आहेत. यामुळे दंतरोगावर त्याचा उत्तम उपयोग होतो. हे तेल लावल्याने पू निर्माण करणार्‍या जंतूचा संसर्ग थांबवण्यास मदत होते. या तेलामुळे दाह किंवा सूज कमी होते. म्हणून हे तेल हिरड्यांवर लावल्यावर हिरड्यांची सूज किंवा दाह कमी होण्यास मदत होईल.

४. लवंग तेल : जंतूचा नायनाट करण्यासाठी या तेलाचा वापर करता येईल. लवंग तेल कापसावर घेऊन दातावर लावल्यास दातदुखी कमी होतेच, पण हिरड्यांचे आजारही कमी होतात. लवंग तेल जंतुनाशक, वेदनाशामक असल्यामुळे दातांच्या रोगावर उत्तम इलाज आहे. लवंगेमध्ये अँटिऑक्सिडंटस आणि मॅगनीज, तंतुमय पदार्थ आणि ओमेगा 3 असल्यामुळे ते सूज आल्यास त्यावर औषध म्हणून उपयोगी पडते.

५. लसूण : नैसर्गिक जंतुनाशक म्हणून लसूण काम करते. लसणात भरपूर प्रमाणात सूज कमी करणारी आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे किडलेल्या दातामुळे जंतूचे वाढते प्रमाण कमी करण्यास मदत करते. लसणामध्ये गंधकाची संयुगे असल्यामुळे ते सूज आणि जंतुसंसर्गावर थेट हल्ला चढवून तुम्हाला दुखण्यापासून आराम देतात.

६. मिठाचे पाणी : तुमच्या दातांमध्ये जीवघेण्या वेदना येत असतील, तर घरातले खायचे मीठ तुम्हाला खूप आराम देऊ शकेल. मीठ सूज कमी करण्यास आणि वेदनाशामक म्हणून काम करू शकते. त्यामुळे पू झालेल्या दातांचे किंवा हिरड्यांचे दुखणे कमी करून, संपूर्ण तोंडात होणारा जंतुसंसर्ग रोखते.

७. हळद : प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असणारी हळद, उत्तम जंतुनाशक आहे. त्याशिवाय ती पू होण्यापासून थांबवते. त्यामुळेच कोणत्याही जखमेवर हळद लावली की जंतुससर्ग थांबवता येतो. त्यामुळे पू झालेल्या दातांमुळे होणार्‍या वेदना ती कमी करते. त्याशिवाय तोंडात हिरड्यांना आलेली सूजही ती कमी करते.

८. बेकिंग सोडा : हा पदार्थदेखील बहुतेकांच्या स्वयंपाकघरात असतो. त्याचा उपयोग तोंडातल्या लाळेचा पीएच सामान्य स्तरावर आणण्यास मदत करते. लाळ दातांना खनिजद्रव्यांचा पुरवठा करते. त्यामुळे दात मजबूत होऊन किडीपासून सरंक्षित राहतात. बेकिंग सोडा हा दात स्वच्छ ठेवण्यासाठीचा उत्तम क्लिन्झर आहे. वरील उपायांनी तुम्ही दात किंवा हिरडी यामध्ये होणारा पू आणि वेदना कमी करू शकता, पण त्या पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजे घेणे महत्त्वाचे आहे.

९. खाल्ल्यानंतर प्रत्येक वेळी व्यवस्थित चूळ भरावी.

१०. सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.

११. खूपच थंड, गरम, कडक पदार्थांचे सेवन शक्‍यतो टाळावे.

१२. तूळसीची ५ ते १० पाने स्वच्छ धुऊन वाटीमध्ये किंवा छोट्या ऊखळीमध्ये घेवून कुटुन त्याचा रस निर्माण करावा आणि त्यात कापुराच्या 3 ते 5 वड्या मिसळून घ्यावे. कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणार्‍या दाढेत ठेवावेत त्यामुळे दाढ दुखी कमी होण्यास मदत होते.

१३. दुखर्यान दाताला बाहेरील बाजूने (गालावर) बर्फाचा खडा दाबून धरल्यानेही दातदुखीपासून थोडा आराम मिळू शकतो.

१४. अचानक दातदुखी सुरू झाल्यास अति गरम, अति गार तसेच अति गोड पदार्थ खाणे कटाक्षाने टाळा अन्यथा दुखणे वाढेल.

१५. आहाराच्या सवयी बदलणे, भाज्या तसेच फळे भरपूर प्रमाणात खाणे आणि विशेषतः जंक फूड न खाणे ह्याने दातदुखी टाळता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *