कटी चक्रासन

1) ‘कटी’चा अर्थ कंबर अर्थात कमरेचे चक्रासन. कटी चक्रासनात हात, मान तसेच कंबरेचा व्यायाम होतो.

2) कृती : सुरवातीला कवायतीमध्ये उभे रहातात, तसे सावधान स्थितीत उभे राहावे. त्यानंतर दोन्ही पायांमध्ये साधारण एका फुटाचे अंतर राहील असे उभे राहावे. दोन्ही हातांना खांद्याच्या समांतर रेषेत सरळ करून हाताची पंजे जमिनीच्या दिशेने करावे.

3) त्यानंतर उजवा हात समोरून फिरवून डाव्या खांद्यावर ठेवावा व डावा हात वाकवून पाठीच्या मागे नेऊन कंबरेवर ठेवावा. कटी चक्रासन करत असताना हे लक्षात घ्या की, कंबरेवर ठेवलेल्या हाताचा पंजा वरच्या बाजूने असला पाहिजे. मान डाव्या खांद्याच्या बाजूने नेऊन मागच्या बाजूला फिरवावी.

4) काही वेळ तशाच अवस्थेत ठेवल्यानंतर पुन्हा मान सरळ करून हात खांद्याच्या समांतर रेषेत करून आधी केलेली क्रिया उजव्या बाजूने करावी. दोन्ही बाजूने ही क्रिया साधारण 5 वेळा करावी.
इशारा : कंबर अथवा मानेचा आजार असलेल्यांनी कटी चक्रासन करू नये.

5) फायदे : कटी चक्रासन कंबर, पोट, पाठीचा मणका व मांड्या यांच्याशी संबंधित आजारांवर फायदेशीर आहे. मान व कंबर यांनी आराम मिळतो. हे आसन केल्याने मान मजबूत व कमरेवरील चरबी कमी होते. तसेच शारीरिक थकवा व मानसिक ताण दूर होतो.

Leave a Comment