नखाचं सौंदर्य वाढवण्यासाठी उपाय

१. हात आणि नखांची काळजी घेण्यासाठी आठवड्यातून एकदा मेनिक्युअरिंग करा. घरच्या घरी मेनिक्युअर केलं तरी कमीत कमी चार ते सहा आठवड्यांतून एकदा पार्लरमधून मेनिक्युअर करून घ्या.

२. आंघोळीनंतर मेनिक्युअर करणं उत्तम. याचं कारण म्हणजे खूप पाण्यामुळे नखांतील मळ निघालेला असतो.

३. आठवड्यातून एकदाच नेलपेन्ट रिमूव्हरचा वापर करा. रिमूव्हरचा अतिवापर केल्यास नखं कोरडी पडतात.

४. नखांना मॉइश्चरायझर पुरवण्यासाठी एखाद्या क्लीअर / ट्रान्स्परन्ट नेलपेन्टचा वापर टॉप कोट किंवा सीलर म्हणून करता येईल.

५. साबणाने हात धुतल्यावर क्रीम किंवा लोशन लावा. साबणामुळे हात आणि नखं कोरडी पडतात. नखांना आणि हातांना पुरेसं मॉइश्चरायझर मिळावं यासाठी लोशन, क्रीम लावा.

६. झोपण्यापूर्वी हात आणि पायांना तेल किंवा मॉइश्चरायझर लावा.

७. नेलपेन्ट लावताना हवेशीर जागेत बसणं अधिक योग्य. खिडकीजवळ किंवा हवा असेल अशा जागेत बसूनच नेलपेन्ट लावा.

८. नेलपेन्ट लावण्यापूर्वी नेलपेन्टची बाटली हलवून घ्या.

९. क्लिअर नेलपेन्टचा बेस कोट लावल्यावर कलर नेलपेन्ट नखांना लावा.

१०. मध्यभाग, डावा आणि उजवा किंवा उजवा, मध्यभाग आणि डावा अशा क्रमाने नेलपेन्ट लावा.

११. नेलपेन्ट लावताना नेहमी दोन कोट लावा. दोन पेक्षा अधिक कोट लावल्यास नखांच्या वाढीचा वेग कमी होतो.

१२. नेलपेन्टचा पहिला कोट सुकल्यावरच दुसरा कोट लावा.

१३. अॅसिटोनचा वापर रीमूव्हर म्हणून करू नका.

१४. नेलपेन्टची बाटली थंड आणि कोरड्या जागेत, सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. ही बाटली तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता.

१५. क्युटिकल्स काढण्यासाठी किंवा नखांवरील नेलपेटं काढताना मेटल इक्विपमेण्टस वापरू नका.

१६. सर्वांत मह्त्वा चे म्हणजे नखं कुरतडू नका. नखं चावल्यामुळे नखं आणि क्युटिकल्स तुटून नखांचा शेप तर बिघडतोच शिवाय नखांच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. तसंच यामुळे इन्फेक्शनही होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *