ब्रश करताना चुका टाळा

१. दिवसांतून किमान दोनदा दात घासण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चुकीच्या पद्धतीने दात घासल्याने दातदुखी किंवा डेंन्टल कॅव्हिटी होण्याची शक्यता अधिक असते.

२. हिरड्यांच्या सरळरेषेत दात घासल्यामुळे, हिरड्या खराब होऊ शकतात. त्यामुळे दात घासताना किमान 45 डिग्री अंशात ब्रश धरल्याने ते अधिक चांगल्याप्रकारे स्वच्छ होतात.

३. फारच कमी वेळ दात घासल्याने ते नीटपणे स्वच्छ होणार नाहीत तर फार वेळ दात घासणे हे देखील घातकच आहे. दिवसातून दोनदा 2-3 मिनिटे दात घासावेत.

४. दातांची स्वच्छता राखण्यासाठी ब्रश सुस्थितीत असणे गरजेचे आहे. ब्रशचे केस वाकडे किंवा खराब झाले असतील तर वेळीच ब्रश बदला.

५. खुप जोरजोरात ब्रश केल्याने हिरड्यांना दुखापत होऊन रक्तप्रवाह होऊ शकतो. तसेच दातांवरील आवरण निघून कॅव्हिटीज वाढण्याची शक्यता असते.

६. बर्‍याच टुथपेस्ट दातांचे रक्षण 12 तासांपर्यंतच करू शकतात. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात नियमित घासणे गरजेचे आहे.

७. जेवल्यानंतर लगेचच दात घासणे चुकीचे आहे. यामुळे दातांचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर किमान 30 मिनिटांनंतर दात घासावेत.

८. ब्रश केल्यानंतर तो नीट धुवून ठेवणे हे देखील आवश्यक आहे. अन्यथा त्यावर बॅक्टेरियांची वाढ होऊ शकते.

Leave a Comment