हळद | Turmeric Benefits In Marathi

– हळद हि वातशामक असल्यामुळे थंडी वाजून होणाऱ्या वातनाडीच्या दाहावर हळद खाण्यासाठी देतात व हळदीने बाहय मालीश करतात.

– हळद पित्तविकृतीवर गुणकारी असल्याने कावीळ व पित्तप्रमेय यावर ती उपयुक्त असते. तसेच पांडुरोगामध्ये त्वरीत गुण येण्यासाठी लोहाबरोबर दिली जाते.

– हळद जंतुनाशक, दुर्गधीनाक व विषहारक आहे तसेच तिच्यात रक्त पसरविण्याचे गुण असल्यामुळे रक्तविकार कंड सुटणे, त्वचारोग, गळवे, सडलेले व्रण यावर हळदीचा लेप केला जातो किंवा हळदीचे पोटीस बांधले जाते.

– मुका मार लागलेल्या जागी हळदीचा उपयोग करतात.

– थंडी वाजून येणारा ताप गरम दूधात हळद व मिरे घालून प्यायल्याने नाहीसा होतो.

– गरम दूधात थोडी हळद घालून ते रात्री झोपताना प्यायल्याने स्वरभंग होणे व घसा बसणे यांवर गुणकारी ठरते.

– सर्दी, कफ व खोकल्यासाठी गरम केलेल्या दूधात हळद व तूप घालून प्यायल्याने फरक पडतो.

– सुजलेल्या टॅान्सिल्सची सूज कमी करण्यासाठी हळद मधात घालून टॅान्सिल्सवर लावावी.

– जखम झालेल्या ठिकाणी हळदीची पूड दाबून धरली असता जखमेतून निघणारे रक्त बंद होते व जखम लवकर भरून निघते.

– जर एखादी जखम लवकर भरून येत नसेल किंवा सुकत नसेल तर अशा जखमेवर हळद घालून गरम केलेले तेल लावल्यास ती जखम लवकर भरून येते.

– हळदीचा धूर हुंगल्याने सर्दी दूर होते.

Leave a Comment